छोट्या गुंतवणूकदारांना आर्थिक फटका; बचत योजनांवरील व्याजदरात 0.20 टक्क्यांनी कपात

केंद्र सरकारने अल्प बचत योजनांवरील व्याजदरात 0.20 टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतलाय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 28, 2017 04:06 PM IST

छोट्या गुंतवणूकदारांना आर्थिक फटका; बचत योजनांवरील व्याजदरात 0.20 टक्क्यांनी कपात

28 डिसेंबर : आताच्या या महागड्या आयुष्यात प्रत्येक जण गुंतवणुकीवर भर देतात. प्रत्येक जण आपल्या उत्पन्नानुसार गुंतवणूक करत असतात. पण छोट्या गुंतवणूक करणाऱ्यांना केंद्र सरकारने मोठा आर्थिक झटकाच दिला आहे. केंद्र सरकारने अल्प बचत योजनांवरील व्याजदरात 0.20 टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे याचा गुंतवणूकदार आणि विविध योजनांवर मोठा परिणाम होणार आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयात नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, सुकन्या योजना, किसान विकास पत्र आणि भविष्य निर्वाह निधीसारख्या योजनांचा समावेश आहे. म्हणजेच काय या योजनांमधून मिळणाऱ्या व्याजात 0.20 टक्क्यांनी कपात करण्यात येईल. या निर्णयाचा गुंतवणूकदारांना मोठा फटका बसणार आहे आणि नुकसानाला समोरे जावं लागणार आहे.

एक जानेवारी ते 31 मार्च दरम्यान या योजनांमधील व्याजदरात कपात केली जाणार आहे. दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या योजनांमधील व्याजदरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. तसंच सेव्हिंग डिपॉझिटमध्येही कुठलेच बदल करण्यात आलेले नाहीत. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने या संदर्भात एक निवेदन जारी केलं आहे. त्यात या सगळ्या बाबी नमूद करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 28, 2017 04:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...