कोणती शहरं कोरोनावर मात करण्यासाठी ठरली रोल मॉडेल, पाहा केंद्राचा रिपोर्ट

कोणती शहरं कोरोनावर मात करण्यासाठी ठरली रोल मॉडेल, पाहा केंद्राचा रिपोर्ट

केंद्राने कौतूक केलेल्या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राची काय स्थिती आहे?

  • Share this:

नवी दिल्ली, 24 मे : भारतात कोरोना विषाणूची प्रकरणं सतत वाढत आहेत. दरम्यान, केंद्र सरकारनं जयपूर, इंदूर, चेन्नई आणि बंगळूरू या शहरांचा कोव्हिड-19 साथीवर नियंत्रण ठेवणारं रोल मॉडेल म्हणून उल्लेख केला आहे. सोबतच महाराष्ट्रातील बृहन्मुंबई नगरपालिकेनं स्वीकारलेल्या रणनीतीचं कौतुकही करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांत केंद्रानं विविध नगरपालिकांच्या बैठका घेतल्या आहेत. ज्यामध्ये कोव्हिड-19चे व्यवस्थापन, सकारात्मक प्रकरणं हाताळण्याच्या प्रभावी अभ्यास आणि मृत्यूदर कमी करण्याच्या विषयावर चर्चा झाली.

कोरोना विषाणूच्या घटनांवर नियंत्रण ठेवणारी शहरं म्हणून सरकारनं इंदूर आणि जयपूरची ओळख केली आहे, तर चेन्नई आणि बेंगळुरूसारख्या प्रमुख शहरांमध्ये मृत्युदर कमी केल्याची ओळख केली आहे. देशातील बर्‍याच महानगरपालिकांना सध्या देशातील सरासरी मृत्यूच्या तुलनेत लवकर दर वाढणे, घटनेचं प्रमाण वाढणं आणि मृतांची संख्या वाढणं यासारख्या आव्हानांना सामोरं जावं लागत आहे.

कोरोनानंतर देशात आणखी एक संकट, या 5 राज्यांना दिला रेड अलर्ट

या व्यतिरिक्त कॅनटेंनमेंट भागात परिघ नियंत्रण, बफर झोनचे मॅपिंग आणि घर-घर पाळत ठेवणं अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित केल्या जात आहे. शहरांच्या नगरपालिकेत झोपडपट्ट्या व इतर उच्च घनता असलेल्या क्षेत्रांमध्ये कोव्हिड-19 व्यवस्थापनात जास्त धोका आहे. इंदूर आणि जयपूरमध्ये घरोघरी सर्वेक्षण आणि संपर्क ट्रेसिंग केले जात आहे.

लहान मुलांनीच केला आई खूनी असल्याचा खुलासा, 'आधी पप्पांना खुर्चीवर बांधलं आणि...

इंदूरने रस्त्यांसाठी विशेष पेट्रोलिंग पथक स्थापन केलं आहे, तर संसर्ग होण्याच्या संभाव्यतेला आळा घालण्यासाठी जयपूरमध्ये विविध भागात भाजीपाला आणि फळ विक्रेत्या संख्या मर्यादित करण्यात आली. दुकाने व दुधा विक्री केंद्रावर मोठ्या संख्येनं लोक येत असल्यानं पालिका कर्मचारी आणि स्थानिक पोलीस यावर बारीक लक्ष ठेवून आहेत. इथे नियमितपणे सॅनिटायझेशन केलं जातं.

याशिवाय बंगळुरू आणि चेन्नईमध्ये मृत्यूचे प्रमाण केवळ एक टक्के आहे तर देशात सरासरी दर तीन टक्के आहे. कोव्हिड-19च्या रूग्णांच्या उपचाराबाबत या दोन दक्षिणेकडील शहरांनी एक उदाहरण ठेवलं आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत बृहन्मुंबई नगरपालिकेनं स्वीकारलेल्या रणनीतीचं कौतुकही करण्यात आलं.

कोरोनावर मात करण्यासाठी तुमच्याकडेही आहे लस, तज्ज्ञांनी केला मोठा खुलासा

संपादन - रेणुका धायबर

First published: May 25, 2020, 1:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading