• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • अफगाणिस्तानात किती भारतीय अडकलेत याची माहिती सरकारकडे नाही - गजानन कीर्तिकर

अफगाणिस्तानात किती भारतीय अडकलेत याची माहिती सरकारकडे नाही - गजानन कीर्तिकर

तालिबानशी चर्चेबाबत भारत सरकार हे वेट अँड वाचच्या भूमिकेत आहेत. भारतीय नागरिक जे अडकले आहेत त्याबाबत तालिबानशी चर्चा होऊ शकते. मात्र इतर विषयाबाबत भारताची भूमिका स्पष्ट नाही.

  • Share this:
नवी दिल्ली, 26 ऑगस्ट : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) भारतातील किती नागरिक (Indian Citizens) अडकले आहे हे सांगायला भारत सरकार तयार नाही. कारण भारत सरकारकडे ती आकडेवारी नाहीये. अफगाणिस्तानमध्ये किती लोक अडकून पडले आहेत? आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत शिवसेनेच्यावतीने हा प्रश्न विचारला होता पण यावर सकारात्मक उत्तर मिळालं नाही अशी माहिती शिवसेना नेते गजानन कीर्तिकर (Shiv Sena Leader Gajanan Kirtikar) यांनी दिली. केंद्र सरकारच्या वतीने अफगाणिस्तानातील परिस्थितीची माहिती देण्याकरिता सर्वपक्षीय बैठक संसद भवनाच्या परिसरात बोलवण्यात आली होती. या बैठकीला शिवसेनेच्यावतीने गजानन कीर्तिकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शरद पवार, काँग्रेस पक्षाच्या वतीने मल्लीकर्जून खर्गे आणि आनंद शर्मा यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे नेते बैठकीला उपस्थित होते. बैठकीमध्ये झालेल्या चर्चेची माहिती देताना गजानन कीर्तिकर भारत सरकारच्या अफगाणिस्तानच्या संदर्भातील भूमिकेचे सर्व पक्षाने समर्थन केले आहे. बैठकीच्या सुरुवातीला परराष्ट्र सचिव माहिती देताना म्हणाले, आम्ही दूतावास हे काबूल एअरपोर्टला शिफ्ट केले. तेथून व्हिसा देतो. अफगाणिस्तानात असलेल्या भारतीय नागरिकांना भारतात आणण्याकरिता भारतीय दूतावासाच्या वतीने संपर्क क्रमांक जारी केले आहे. सध्याची अफगाणिस्तानमध्ये परिस्थिती बघता जो नागरिक आम्हाला संपर्क करतात त्यांना विमानतळापर्यंत पोहोचतो, त्यांना भारतात परतण्यासाठी आम्ही सर्व सुविधा देत आहोत. तालिबानच्या हाती अमेरिकन शस्त्र लागले आहेत. त्याचा आपल्याला म्हणजे भारतात धोका आहे का? असा प्रश्न आहे. त्यावर सरकारच्या वतीने सरकारच्यावतीने फार काही स्पष्टपणे सांगण्यात आले नाही असे शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी सांगितले. "मी स्वत: अडचणीत आहे तर मंत्र्यांच्या अडचणीचं काय विचारता?" प्रताप सरनाईकांच्या विधानाने खळबळ अफगाणिस्तान हा आंतराष्ट्रीय मुद्दा आहे, त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते की आम्ही या मुद्द्यावर भारत सरकार सोबत आहे. त्यामुळे आता फक्त जे देशात अफगाणी नागरिक हिंदू आणि शीख, बौद्ध येत आहेत त्यांना सीएएए अंतर्गत नागरिकत्व देणार का? हे शिवसेनेने विचारले. अफगाणिस्तान अडकलेल्या लोकांना स्वतः आमच्याशी संपर्क साधायला हवा, तर आम्ही बाहेर काढू शकतो. एअरपोर्टवर पोहचले की भारत सरकार एअरलिफ्ट करते, अशी माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली. अफगाणिस्थानातील भारतीय गुंतवणूक भावनात्मक आहे, ती कमर्शिअल नाही. त्यामुळे ही गुंतवणूक परत देण्याचा मुद्दा उपस्थित होत नाही असेही स्पष्टीकरण भारत सरकारच्या वतीने आजच्या बैठकीत देण्यात आले. तालिबानशी चर्चेबाबत भारत सरकार हे वेट अँड वाचच्या भूमिकेत आहेत. भारतीय नागरिक जे अडकले आहेत त्याबाबत तालिबानशी चर्चा होऊ शकते. मात्र इतर विषयाबाबत भारताची भूमिका स्पष्ट नाही. पण दोन देशातील संवादबाबत तालिबानी भूमिका काय घेतायत हे पाहावे लागेल, असे देखील भारत सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले अशी माहिती गजानन कीर्तिकर यांनी दिली.
First published: