• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • टेक्स्टाइल सेक्टरला मोदी सरकारचं सर्वात मोठं गिफ्ट! या आठ राज्यांना होणार फायदाच फायदा

टेक्स्टाइल सेक्टरला मोदी सरकारचं सर्वात मोठं गिफ्ट! या आठ राज्यांना होणार फायदाच फायदा

या पीएलआय स्कीमला (PLI Scheme) मिळालेल्या मंजुरीमुळे आत्मनिर्भर भारत अभियानाला (Atmanirbhar Bharat) अधिक बळकटी येणार आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 08 सप्टेंबर: कोरोनामुळे बऱ्याच व्यवसायांना फटका बसला आहे. यातच टेक्स्टाइल सेक्टरला (Cabinet decision for textile sector) केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या एका बैठकीमध्ये (Cabinet ministry meeting) कापड उद्योगासाठी पीएलआय (Production linked incentive) स्कीम मंजूर (Scheme for textile industry) करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, कापड उद्योगाशी संबंधित 10 उत्पादनांवर (PM Modi cabinet meeting) पुढील पाच वर्षांसाठी 10,683 कोटी रुपयांहून अधिक रकमेचं पॅकेज देण्यात येईल. या पीएलआय स्कीमला (PLI Scheme) मिळालेल्या मंजुरीमुळे आत्मनिर्भर भारत अभियानाला (Atmanirbhar Bharat) अधिक बळकटी येणार आहे. या पॅकेजमध्ये टिअर 2 आणि टिअर 3 वाल्या कंपन्यांना अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. यासोबतच मॅनमेड फायबर अपॅरल आणि टेक्निकल टेक्स्टाइल यासाठी पीएलआयला (PLI for textile) मंजुरी मिळाली आहे. यामुळे ग्रामीण भागातला कापड व्यवसाय वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे. यासोबतच, केवळ भारतात रजिस्टर मॅन्युफॅक्चरिंग असणाऱ्या कंपन्याच (PLI for Indian companies) यासाठी पात्र ठरणार असल्याचंही यात म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी सांगितलं, की या निर्णयामुळे हजारो लोकांना थेट रोजगार मिळू शकणार आहे. सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, यातून 7.5 लाख लोकांना रोजगार मिळेल. पॅकेजची (PLI package) दोन भागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. पहिला भाग हा 100 कोटी रुपयांपर्यंत प्रॉडक्शन आणि दुसरा भाग हा 300 कोटी रुपयांपर्यंत प्रॉडक्शन असणार आहे. यासोबतच सरकार सध्या निर्यात (Export) वाढवण्यासंबंधीही विचार करत असल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले. हे वाचा - कमाईची आणखी एक संधी! 14 सप्टेंबरला येत आहे नवा IPO; किती करावी लागेल गुंतवणूक पीयूष गोयल म्हणाले, “भारत सध्या यूके, युरोपियन यूनियन आणि यूएई सारख्या पाश्चिमात्य देशांसोबत मुक्त व्यापार करारावर (FTA) काम करत आहे. आम्ही भारतीय उत्पादनांवर टॅरिफ निर्बंधांना कमी करण्याची योजना तयार करत आहोत. आजच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाचा फायदा मुख्यत्वे गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि ओडिशा या राज्यांना होणार आहे. इतर राज्यांनाही याचा फायदा होईलच.” टेक्स्टाइलचा सर्वांत जास्त उपयोग आरोग्य आणि संरक्षण क्षेत्रात केला जातो. भारत सध्या पीपीई किट बनवणारा जगातील दुसरा सर्वांत मोठा देश (World’s second largest PPE kit maker) आहे. दरम्यान, आज झालेल्या बैठकीत टेलिकॉम सेक्टरसाठीही पॅकेज घोषित करण्यात येईल असा अंदाज होता. तसंच, रब्बी पिकांसाठी एमएसपी वाढवण्यासंबंधी निर्णय घेतला जाण्याची शक्यता होती; मात्र बैठकीनंतर याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नाही.
  First published: