CISFच्या 1.62 लाख जवानांना सरकारला द्यावा लागेल FB, Twitterचा ID, नाहीतर कारवाई

CISFच्या 1.62 लाख जवानांना सरकारला द्यावा लागेल FB, Twitterचा ID, नाहीतर कारवाई

जवान आणि अधिकाऱ्यांना हनीट्रॅपमध्ये फसवून त्यांच्याकडून संवेदनशील माहिती काढून घेण्याच्या घटनाही उघडकीस आल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 1 ऑगस्ट: केंद्र सरकारने नवा आदेश काढत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल/सीआईएसएफच्या (CISF) जवानांना आपले सोशल मीडिया अकाउंट्ची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तब्बल 1.62 लाख जवानांना आपल्या सोशल मीडिया (Social Media) ची माहिती सरकारला द्यावी लागणार आहे. यात Facebook, Twitter, Instagram, You Tube, अकाउंट्ची माहिती द्यावी लागणार आहे. त्याच बरोबर या प्लॅट्फॉर्म्सवरून सरकारवर टीका करता येणार नाही असंही बंधन घालण्यात आलं आहे.

या नियमांचं पालन केलं नाही तर कारवाई होणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. CISF सध्या देशातली 63 विमानतळं, विविध संस्था, विविध सरकारी मंत्रालयांची कार्यालये यांची सुरक्षा व्यवस्था पाहाते आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून महत्त्वाची आणि गुप्त माहिती बाहेर जात असल्याचं लक्षात आल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे.

कुठल्याही खोट्या अकाउंटवरून माहिती देऊ नये तसेच सरकारच्या धोरणांविरोधात वक्तव्य करू नये असंही या जवानांना बजावण्यात आलं आहे.

पाकिस्तान आणि चीनचा हेरगिरीचा धोका लक्षात घेऊन लष्कराच्या जवानांना सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घालण्यात आली होती. FACEBOOK आणि INSTAGRAM सह तब्बल 89 Apps वापरण्यावर बंदी घालण्यात आली होती. हे सर्व Apps डिलीट करण्याचे आदेशही देण्यात आले होते.

अमरसिंगांचं बॉलिवूडशी होतं ‘कलरफूल’ नातं, जया प्रदांना बनवलं थेट खासदार

जवानांच्या मोबाईमध्ये हे Apps आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला होता. पाकिस्तान आणि चीन हे सोशल मीडियाचा वापर करून पाळत ठेवत असल्याची काही प्रकरणं उघडीस झाल्याने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती.

‘अमेरिकेत 5 महिन्यात येणार COVID-19वर लस’, तज्ज्ञांच्या दाव्याने आशा वाढली

सैनिक आणि अधिकाऱ्यांना हनीट्रॅपमध्ये फसवून त्यांच्याकडून संवेदनशील माहिती काढून घेण्याच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. हे  Apps  वापरणाऱ्याचा सगळा डेटा आणि माहिती ती भारताबाहेर असलेल्या त्यांच्या सर्व्हर रुमला पाठविण्यात येत असल्याचं उघड झाल्याने सरकारने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं होतं.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 1, 2020, 10:20 PM IST

ताज्या बातम्या