मराठी बातम्या /बातम्या /देश /

NIRF Ranking 2021: केंद्र सरकारकडून देशातील टॉप 10 कॉलेजेस, विद्यापीठं आणि संस्था जाहीर; बघा संपूर्ण यादी

NIRF Ranking 2021: केंद्र सरकारकडून देशातील टॉप 10 कॉलेजेस, विद्यापीठं आणि संस्था जाहीर; बघा संपूर्ण यादी

देशातील काही सर्वोत्तम शिक्षण देणाऱ्या संस्था, काही विद्यापीठं आणि कॉलेजेस यांची यादी जाहीर

देशातील काही सर्वोत्तम शिक्षण देणाऱ्या संस्था, काही विद्यापीठं आणि कॉलेजेस यांची यादी जाहीर

देशातील काही सर्वोत्तम शिक्षण देणाऱ्या संस्था, काही विद्यापीठं आणि कॉलेजेस यांची यादी जाहीर

  • Published by:  Atharva Mahankal

नवी दिल्ली, 09 सप्टेंबर: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) जाहीर केलं आहे. यानुसार देशभरातील टॉप 10 कॉलेजेस (Top 10 colleges in India), विद्यापीठं (Top 10 Universities in India) आणि संस्था (Top 10 Institutes in India) यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही रँकिंग (NIRF Ranking 2021) दरवर्षी जारी केली जाते. त्यानुसार देशातील काही सर्वोत्तम शिक्षण देणाऱ्या संस्था, काही विद्यापीठं आणि कॉलेजेस यांची यादी जाहीर केली जाते.

या यादीत दिल्लीतील मिरांडा हाउस कॉलेज, तर इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स बंगलोर या विद्यापीठानं आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास या संस्थेनं बाजी मारली आहे. इतरही कॉलेजेस, विद्यापीठं आणि संस्था यांची यादी सरकारनं जाहीर केली आहे.

हे आहेत टॉप 10 कॉलेजेस

मिरांडा हाऊस, दिल्ली

लेडी श्री राम महिला महाविद्यालय, दिल्ली

लोयोला कॉलेज, चेन्नई

सेंट झेवियर्स कॉलेज, कोलकाता

रामकृष्ण मिशन विद्यामंदिर, हावडा

PSGR कृष्णामल कॉलेज फॉर वुमन, कोईम्बतूर

प्रेसिडेन्सी कॉलेज, चेन्नई

सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली

हिंदू कॉलेज, दिल्ली

श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स, दिल्ली

हे वाचा - RRB Group D Exam: उमेदवारांनो, लवकरच जाहीर होणार परीक्षेची तारीख; Admit Card ही होणार जारी; बघा डिटेल्स

टॉप 10 कॉलेजेस युनिव्हर्सिटीज

भारतीय विज्ञान संस्था, बंगलोर

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली

बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी

कलकत्ता विद्यापीठ, कोलकाता

अमृता विश्व विद्यापीठ, कोईम्बतूर

जामिया मिलिया इस्लामिया, नवी दिल्ली

मणिपाल उच्च शिक्षण अकादमी, मणिपाल

जादवपूर विद्यापीठ, कोलकाता

हैदराबाद विद्यापीठ, हैदराबाद

अलीगढ मुस्लिम विद्यापीठ, अलीगढ

टॉप 10 शिक्षण संस्था

IIT मद्रास

IISc, बेंगळुरू

IIT दिल्ली

IIT बॉम्बे

IIT खरगपूर

IIT कानपूर

IIT गुवाहाटी

जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी

IIT रुड़की

बनारस हिंदू युनिव्हर्सिटी

First published: