SSR Death Case: CBIने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रिया, दिले महत्त्वाचे संकेत

SSR Death Case: CBIने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रिया, दिले महत्त्वाचे संकेत

सुशांतच्या वडिलांचे वकिल विकास सिंह यांनी सीबीआयच्या तपासाबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली होती. हा तपास कुठल्या दिशेने सुरू आहे हेच कळत नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

  • Share this:

नवी दिल्ली 28 सप्टेंबर: सुशांतसिंह राजपूत मृत्यू (Sushant Singh Rajput) प्रकरणाची सीबीआय चौकशी करत आहे. मात्र या चौकशीबाबात सीबीआयकडून (Central Bureau of Investigation (CBI)) कुठलीही माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे सुशांतच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर सीबीआयच्या वतीने आता पहिल्यांदाच माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने सुरू आहे.

आम्ही सर्वच शक्यतांचा तपास करत आहोत. कुठलाही अँगल आम्ही तपासातून वगळलेला नाही असे अत्यंत महत्त्वाचे संकेत सीबीआने दिले आहेत. अत्यंत प्रोफेशनल पद्धतीने हा तपास सुरू असल्याचंही सीबीआयचे वतीने सांगण्यात आल्याचं वृत्त ANIने दिलं आहे.

या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदील दिल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने हा तपास सीबीआयकडे सोपवला होता. सीबीआयचं खास पथक हा तपास करत आहे. मात्र सुशांतच्या वडिलांचे वकिल विकास सिंह यांनी सीबीआयच्या तपासाबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली होती. हा तपास कुठल्या दिशेने सुरू आहे हेच कळत नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

काय म्हणाले होते विकास सिंह?

'सुशांतचे मृत्यूनंतरचे फोटो पाहून AIIMS च्या एका डॉक्टरांनी ही 200 टक्के हत्या असल्याचं सांगितलं होतं. ही आत्महत्या असूच शकत नाही, असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. मग CBI आत्महत्या नसून हत्या असल्याच्या दिशेने तपास का करत नाही', असं विधान विकास सिंह यांनी शुक्रवारी केलं होतं. ते सुशांतचे वडील के. के.सिंह यांचे वकील आहेत.

'करण जोहरचं नाव घेतलं तरच...' ड्रग्ज प्रकरणात क्षितीज प्रसादचा NCB वर आरोप

CBI च्या तपासाप्रकरणी आपण समाधानी नाही, असं या वकिलांचं म्हणणं आहे. सुशांतच्या मृत्यूप्रकरणी नार्कोटिक्स विभागानेही चौकशी सुरू केली आहे. रियाला अटकही केली आहे. पण NCB च्या तपासातून सत्य बाहेर येणार नाही, असं विकास सिंह यांचं म्हणणं आहे. बॉलिवूडच्या अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान आणि अन्य मोठ्या तारे-तारकांना चौकशीसाठी बोलावून फक्त मूळ प्रकरणावरून लक्ष दुसरीकडे वेधलं जाणार आहे, असा आरोप विकास सिंह यांनी केला.

CBI ने आत्तापर्यंतच्या तपासासंदर्भात एकदाही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली नाही. त्यांनी बैठकासुद्धा घेतलेल्या नाहीत.

CBI आणि NCB या दोन्ही केंद्रीय संस्थांच्या तपासाबद्दल सुशांतच्या कुटुंबाच्या वकिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. सुशांतचा परिवार या तपासाबाबत नाराज असल्याचं ते म्हणाले. "रिया चक्रवर्तीची चौकशी झाली, तेव्हा तिने ड्रग्ज विकत घेतल्याचं कबूल केलं. पण तिने सुशांतसाठी ड्रग्ज घेतल्याचा दावा केला. आता सुशांत या जगात नाही.

ड्रग्जप्रकरणी 6 महिन्यांतच दाखल होणार चार्जशीट; बडे सेलिब्रिटी NCB च्या रडारवर

त्यामुळे ती खरं बोलते आहे की नाही, हे कोण ठरवणार? आरोपी रिया स्वतःसाठी ड्रग्ज घेत नव्हती कशावरून? ती सुशांतला ड्रग्ज द्यायची तर ते चहा-कॉफीबरोबर द्यायची की आणखी कसे... यातलं खरं-खोटं कोण सांगणार", असा सवाल विकास सिंह यांनी केला.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 28, 2020, 4:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading