पैशाचा महापूर, मध्यप्रदेशातल्या छाप्यांमध्ये सापडली 281 कोटींची रक्कम

पैशाचा महापूर, मध्यप्रदेशातल्या छाप्यांमध्ये सापडली 281 कोटींची रक्कम

या छाप्यात दारू आणि शस्त्रही अधिकाऱ्यांना सापडल्याने अधिकारीही चक्रावून गेले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली 8 एप्रिल : सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (Central Board of Direct Taxes (CBDT) ) च्या अधिकाऱ्यांनी मध्यप्रदेशमध्ये घातलेल्या छाप्यांमध्ये अधिकाऱ्यांना मोठं घबाड सापडलं आहे. 281 कोटींची रक्कम आणि बेनामी संपत्ती सापडल्याने खळबळ उडाली आहे. राजकारणी, व्यावसायीक, अधिकारी, व्यापारी, सामाजिक कामात सक्रीय असणारे मान्यवर अशा विविध लोकांवर CBDT च्या अधिकाऱ्यांनी छापे घातले होते. त्यात ही प्रचंड रक्कम आणि बेहिशेबी संपत्तीचा खुलासा झाला आहे.

दारू आणि शस्त्रही अधिकाऱ्यांना सापडल्याने त्याचं गांभीर्य आणखी वाढलं आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या जवळच्या लोकांवरही छापे घालण्यात आले होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये जी संपत्ती सापडली त्यामुळे धक्का बसला आहे.मध्यप्रदेशात काय झालं?

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याशी संबंधित अधिकारी आणि जवळच्या लोकांवर आयकर विभागाचं सुरू असलेलं छापासत्र सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच होतं. या कारवाईमुळे मध्यप्रदेशात खळबळ निर्माण झाली आहे. या छाप्यातून 9 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आलीय. तर हे छापे राजकीय कारणांमुळे घातले जात असल्याचा आरोप मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमननाथ यांनी केला आहे.

मुख्यमंत्री कमलनाथ यांचे खासगी सचिव प्रविण कक्कड यांच्या विश्वासातले प्रतीक जोशी आणि अश्विन शर्मा यांच्या निवासस्थानी हे छापे घालण्यात आले होते. या कारवाईची माहिती निवडणूक आयोगालाही देण्यात आली आहे. गेल्या 40 तासांपासून मध्यप्रदेशसह देशभरातल्या 50 ठिकाणी ही कारवाई करण्यात येत आहे.

रविवारी पहाटे तीन वाजता ही कारवाई करण्यात आली. भोपाळ, दिल्ली, कोलकता आणि गोव्यात ही कारवाई करण्यात येत आहे. यासाठी CRPF च्या जवानांची मदत घेण्यात आली आहे. CRPF  आणि मध्यप्रदेश पोलिसांमध्येही वादही झाला होता.

या छाप्यांमध्ये मोठं घबाड मिळाल्याचा अंदाज सुत्रांनी व्यक्त केलाय. पैसे मोजण्यासाठी आणखी काही मशिन्स अधिकाऱ्यांनी मागवल्या आहेत.

कोण आहेत प्रविण कक्कड?

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे सचिव प्रविण कक्कड यांच्या घरावर आयकर विभागानं छापा मारला. इंदूरमधील घरावर ही कारवाई करण्यात आली. काँग्रेसच्या अत्यंत जवळचे असलेले प्रविण कक्कड यांनी आपला सर्वाधिक काळ हा पोलीस सेवेत घालवला आहे. राष्ट्रपती पदकानं देखील त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. पण, आयकर विभागानं मारलेल्या छाप्यामुळं आता प्रविण कक्कड चर्चेत आले आहेत.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 8, 2019 09:56 PM IST

ताज्या बातम्या