पंतप्रधानांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ अपीलनंतर अमित शाह यांनी घेतला मोठा निर्णय

पंतप्रधानांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ अपीलनंतर अमित शाह यांनी घेतला मोठा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशा उत्पादनांवर जास्त भर देण्याचे आवाहन लोकांना केले होते. मोदींच्या या आवाहनानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी एक मोठी घोषणा केली.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जनतेशी संवाद साधत चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनबाबत माहिती दिली. तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशा उत्पादनांवर जास्त भर देण्याचे आवाहन लोकांना केले होते. यासाठी मोदींनी Vocal for Local हे सांगत लोकानां स्वदेशी वस्तुंचा जास्तीत जास्त वापर करण्यास सांगितले. मोदींच्या या आवाहनानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी एक मोठी घोषणा केली.

अतिम शहा यांनी ट्वीट करत असे सांगितले ती, सर्व केंद्रीय अर्धसैनिक पोलीस दलाच्या कॅन्टीन व स्टोअरमध्ये फक्त स्वदेशी उत्पादने विकली जातील. हा निर्णय 1 जूनपासून अंमलात आणला जाणार आहे. यामुळे 10 लाख केंद्रीय अर्धसैनिक दलातील सुमारे 50 लाख कुटुंबे केवळ 2800 कोटी रुपयांची देशी उत्पादने खरेदी करतील.

वाचा-आत्मनिर्भर म्हणजे, तुमचे तुम्ही पाहा; काँग्रेस नेत्यांची मोदींवर सडकून टीका

अमित शाह यांनी काय केले ट्वीट?

अमित शाह यांनी ट्वीट करत, काल पंतप्रधानांनी देशाला आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले. लोकांना जास्तीत जास्त स्वदेशी वस्तुंचा वापर करण्यास सांगितले होते. यामुळं निश्चितच येणाऱ्या काळात भारत जगाचे नेतृत्व करू शकेल, असे सांगत शाह यांनी केंद्रीय अर्धसैनिक पोलीस दलाच्या कॅन्टीन व स्टोअरमध्ये फक्त स्वदेशी उत्पादने विकली जातील. अशी घोषणा केली. यामुळं जवळजवळ 50 लाख कुटुंब स्वदेशी वस्तुंचा वापर करतील.

वाचा-PM CARE फंडसाठी एवढी जाहिरात कशासाठी? 20 लाख कोटींच पॅकेज देणाऱ्या मोदींना सवाल

5 वर्षात देशाला आत्मनिर्भर करायचे आहे-अमित शाह

अमित शाह यावेळी असेही म्हणाले की, देशातील बनवलेल्या उत्पादनांचा जास्तीत जास्त वापर करुन इतरांनीही तसे करण्यास प्रोत्साहित करावे असे मी आवाहन लोकांना करतो. प्रत्येक भारतीयाने स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचे वचन दिले तर पाच वर्षांत देशातील लोकशाही स्वयंपूर्ण होऊ शकते.

वाचा-पंतप्रधानांच्या घोषणेपूर्वीच गडकरींची 'आत्मनिर्भरता', नागपुरात आधीच करून दाखवलं!

काय म्हणाले होते मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात देशाता आत्मनिर्भर करण्यास सांगितले. आज जगभरात स्वयंपूर्ण शब्दाचा अर्थ पूर्णपणे बदलला आहे, असेही सांगितले. यावेळी मोदींनी 20 लाख कोटी रुपयांचं हे पॅकेजची घोषणा केली. त्यासह 2020 मध्ये देशाच्या विकास यात्रेला व स्वावलंबी भारताच्या संकल्पनेले नवीन गती मिळवून देईल. या पॅकेजमध्ये जमीन, कामगार, लिक्वडिटी (तरलता) आणि कायदा या सर्वांवर लक्ष दिले आहे. हे पॅकेज कृषी, एमएसएमई, लघु उद्योग यांच्यासाठी करण्यात आले आहे. हे आर्थिक पॅकेज देशातील शेतकरी व श्रमिकांसाठी आहे. हे पॅकेज मध्यमवर्गींसाठी आहे, जो प्रामाणिकपणे टॅक्स देतो.

वाचा-मोदींची सर्वात मोठी घोषणा; 20 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजमुळे कोणाला होईल फायदा?

First published: May 13, 2020, 2:22 PM IST
Tags:

ताज्या बातम्या