एमटीएनएल आणि बीएसएनएलच्या विलिनीकरणाला केंद्राची मंजुरी

एमटीएनएल आणि बीएसएनएलच्या विलिनीकरणाला केंद्राची मंजुरी

बीएसएनएल कंपनी गेल्या काही वर्षांपासून तोट्यात आहे. 2017-18 या आर्थिक वर्षात बीएसएनएलला 31 हजार 287 कोटींचा तोटा झाला.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर: प्रचंड तोट्यात असलेल्या एमटीएनएल आणि बीएसएनएलच्या विलिनीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. दोन्ही कंपन्यांसाठी केंद्रानं एकूण ६९ हजार कोटींचं पॅकेज तयार केलं आहे.

गेल्या काही महिन्यांपासून तोट्यात असणाऱ्या भारत संचार निगम लिमिटेड (BSNL)आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (MTNL)या दोन्ही कंपन्या बंद करण्याचा सल्ला केंद्रीय वित्त मंत्रालयानं दिला होता. डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनने (DOT)दोन्ही कंपन्यांना पूर्वपदावर आणण्यासाठी जवळपास 74 हजार कोटींचा प्रस्ताव दिला होता. मात्र, हा प्रस्ताव अर्थमंत्र्यांनी धुडकावून लावला. अर्थमंत्र्यांनी दोन्ही पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग कंपनी बंद करण्याचा सल्लाही दिला होता.

अखेर आज एमटीएनएल आणि बीएसएनएलच्या विलिनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये दोन्ही कंपन्यांचं पुनर्भांडवलीकरण आणि ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या संभाव्य व्हीआरएससाठी तरतुदीचा समावेश आहे. या कंपन्या म्हणजे सरकारसाठी सामरिकदृष्ट्याही महत्वाच्या आहेत, त्यामुळे त्याच्या खासगीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही, असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी स्पष्ट केलं.

बीएसएनएल आणि एमटीएनएलला लागली कळा

एकेकाळी बीएसएनएल आणि एमटीएनएल हे दोन्ही देशात सर्वात मोठं टेलिकॉम नेटवर्क म्हणून ओळखलं जात होतं. आजही कित्येक गावांमध्ये फक्त बीएसएनएल नेटवर्क मिळतं. तर जिथे खासगी मोबाईल कंपन्यांचं नेटवर्क मिळत नाही अशा ठिकाणीही बीएसएनएलचं नेटवर्क मिळत असल्यानं त्याचा वापर एकेकाळी सर्वाधिक होता.

बीएसएनएल कंपनी गेल्या काही वर्षांपासून तोट्यात आहे. 2017-18 या आर्थिक वर्षात बीएसएनएलला 31 हजार 287 कोटींचा तोटा झाला आहे. याशिवाय अनेक कर्मचाऱ्यांचे वेतन, स्वेच्छा निवृत्ती यागळ्या गोष्टींवरही विचारविनीमय सुरू होता.

फायनाशियस एक्स्प्रेसच्या अहवालानुसार, बीएसएनएल आणि एमटीएनएल 1.65 लाख कर्मचाऱ्यांना अद्याप आकर्षित रियारर्मेंट प्लॅन देणं आणि कंपनीवरील कर्ज फेडणं आणि त्यानंतर कंपनी बंद करण्यासाठी सरकारला साधारण 95 कोटींचा खर्च येण्याची चिन्हं आहेत. अनेक कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्यानं तेही देणं बाकी आहे. तर निवृत्तीचं वयही 60 वरुन 58 करण्याचा प्रस्तावही कंपनीला अर्थमंत्र्यांनी दिला होता.

आर्थिक संकटात सापडल्यानं अर्थमंत्र्यांनी दोन्ही कंपन्या बंद करण्याचा सल्ला केंद्र सरकारला दिला होता. तर दुसरीकडे कंपनीला संजीवनी देण्यासाठी काही प्रस्ताव असतील तर तेही मागवण्यात आले आहेत. दोन्ही कंपन्या बंद झाल्या तर मोठं नुकसान होणार आहे. 2019च्या आर्थिक वर्षात बीएसएनएलला एकूण 13 हजार 804 कोटींचा तोटा झाला.

============

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 23, 2019 11:29 PM IST

ताज्या बातम्या