जनगणना होणार डिजिटल, घरोघरी फिरून नव्हे तर मोबाइल अ‍ॅपने होणार

जनगणना होणार डिजिटल, घरोघरी फिरून नव्हे तर मोबाइल अ‍ॅपने होणार

भारताच्या जनगणनेसाठी पहिल्यांदाच मोबाइल अ‍ॅपचा वापर केला जाणार आहे. याद्वारे गोळा केलेली माहिती कल्याणकारी योजनांसाठीही उपयोगी पडेल.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी दिल्लीच्या जनगणना भवनाची कोनशिला स्थापन केली. डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी जनगणना मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून जनगणना केली जाईल, असं अमित शहांनी सांगितलं.याआधी घरोघरी फिरून जनगणना केली जायची पण आता ही माहिती मोबाइल अ‍ॅपद्वारे गोळा केली जाणार आहे.

जनगणनेसाठी संदर्भाची तारीख 1 मार्च 2021 असेल. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हिमवृष्टी होण्याची शक्यता लक्षात घेऊन तिथे ही तारीख 1 ऑक्टोबर 2020 असेल.

जनगणनेसाठी पहिल्यांदाच मोबाइल अ‍ॅपचा वापर केला जाणार आहे. याद्वारे गोळा केलेली माहिती कल्याणकारी योजनांसाठीही उपयोगी पडेल. त्याचबरोबर मतदारसंघांच्या सीमा ठरवण्यासाठीही हीच माहिती आधारभूत ठरणार आहे.

भारताच्या एकूण 130 कोटींच्या लोकसंख्येला या जनगणनेचे काय फायदे होतील हे सांगितलं पाहिजे, असंही अमित शहांनी म्हटलं आहे.

याआधी 2011 च्या जनगणनेद्वारे आलेल्या माहितीवरून वीजपुरवठा, गॅस कनेक्शन, रस्तेबांधणी, गरिबांसाठी घरं, बँक खाती या योजना सुरू करण्यात आल्या होत्या.

भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत भारताकडे मर्यादित नैसर्गिक स्रोत आहेत. त्यामुळेच लोकसंख्या नियंत्रणाला सरकारचं प्राधान्य आहे,असं अमित शहांनी सांगितलं.

===================================================================================

VIDEO: 'आरे'तील वृक्षतोडीला विरोध करण्यामागे वेगळा मनसुबा? मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली शंका

Published by: Arti Kulkarni
First published: September 23, 2019, 8:47 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading