कठुआ बलात्कार : ती माझी मुलगीही असती, मी न्यायासाठी लढणार-कमल हासन

कठुआ येथील बकरवाल समाजातील एका 8 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार आणि नंतर तिची दगडाने ठेचून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार जम्मू काश्मीरमध्ये घडला आहे. सेलिब्रिटींनीही ट्विट करून संताप व्यक्त केलाय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Apr 13, 2018 05:06 PM IST

कठुआ बलात्कार : ती माझी मुलगीही असती, मी न्यायासाठी लढणार-कमल हासन

13 एप्रिल : कठुआ येथील बकरवाल समाजातील एका 8 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार आणि नंतर तिची दगडाने ठेचून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार जम्मू काश्मीरमध्ये घडला आहे. अख्खा देश हादरून गेलाय. सेलिब्रिटींनीही ट्विट करून संताप व्यक्त केलाय.

अभिनेते कमल हासननं म्हटलंय, तुमची मुलगी असती तरच तुम्ही हे समजून घेतलं असतं का? ती माझीही मुलगी असू शकली असती. एक पुरुष, वडील आणि नागरिक म्हणून मला संताप आलाय. मी माफी मागतो की आम्ही तुझ्यासाठी सुरक्षित देश नाही बनवू शकलो. मी तिच्या न्यायासाठी लढेन, म्हणजे पुढे भविष्यकाळात कुठल्याही चिमुकलीबरोबर असं होता कामा नये.

Loading...

प्रियांका चोप्रानंही ट्विट करून आपली चीड व्यक्त केलीय. ती म्हणते, राजकारण आणि धर्माच्या नावाखाली किती छोट्यांचा बळी जाणार आहे? यावर ताबडतोब कारवाई करणं हे ती छोटी मुलगी आणि माणुसकीप्रति आपलं कर्तव्य आहे.

तर जावेद अख्तरनी म्हटलंय, ती असिफा मुलगी कोण? ती एक 8 वर्षांची बकरवाल्याची चिमुरडी. बकरवाले कोण आहेत? ही एक बंजारा जात आहे. त्यांनीच कारगीलमधल्या घुसखोरांची माहिती लष्कराला दिली होती. आणि आता जे लोक बलात्कार करणाऱ्यांच्या मागे उभे आहेत, ते कोण आहेत?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2018 05:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...