• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • भय्यूजी महाराजांची चटका लावणारी एक्झिट - मान्यवरांच्या प्रतिक्रिया

भय्यूजी महाराजांची चटका लावणारी एक्झिट - मान्यवरांच्या प्रतिक्रिया

त्यांच्या निधनानं सगळ्यांनाच धक्का बसला. अनेक मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया पहा

  • Share this:
इंदूर, 12 जून : अाध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.  त्यांनी त्यांच्या राहत्या घरीच डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर त्यांना इंदूरच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. ते 50 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानं सगळ्यांनाच धक्का बसला. अनेक मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया पहा- नितीन गडकरी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री आध्यात्मिक गुरु श्री भय्यूजी महाराज यांच्या निधनाची दु:खद बातमी कळली. त्यांच्याशी माझे व्यक्तिगत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांचा हा अकाली मृत्यू मनाला चटका लावणारा आहे. माझी विनम्र श्रद्धांजली. आदित्य ठाकरे, युवासेनाअध्यक्ष, शिवसेना खूपच वेदनादायी आणि धक्कादायक अशी बातमी आहे. अजूनही या बातमीवर विश्वास बसत नाही. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष, भाजप अकाली मृत्यू मोठा धक्का लावून जाणारा आहे. न भरून निघणारी पोकळी निर्माण झालीय. सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक क्षेत्रातील कार्य प्रेरणादायी, भावपूर्ण आदरांजली. नवाब मलिक, प्रवक्ते राष्ट्रवादी श्री भय्यूजी महाराज यांच्या निधनाची बातमी धक्कादायक व दुःखद आहे. महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील अनेक सामाजिक कार्यांत त्यांचा सहभाग होता. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. मधुर भांडारकर, दिग्दर्शक भय्यूजी महाराज यांच्या अकाली निधनामुळे अत्यंत धक्का बसला. ते फक्त लोकप्रिय आध्यात्मिक गुरू नव्हते, तर त्यांच्या ग्रामीण भागातील सामाजिक कार्यासाठी ते विशेष ओळखले जायचे...ओम शांती धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद अनेकांना जगण्याचा मंत्र त्यांनी दिला.आपल्या सर्वांची मोठी आध्यात्मिक, सामाजिक हानी झाली.ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
First published: