RSSच्या सदस्याकडून हवेत तुफान गोळीबार, पोलिसांडून चौकशीचे आदेश

RSSच्या सदस्याकडून हवेत तुफान गोळीबार, पोलिसांडून चौकशीचे आदेश

विजयादशमीनिमित्तानं उत्तर प्रदेशातील सीतापूर इथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील सदस्याकडून हवेत गोळीबार.

  • Share this:

सीतापूर, 09 ऑक्टोबर: राष्ट्रीय स्वयं सेवक संघच्या सदस्यांनी हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील सीतापूर इथे रा. स्व. संघाच्या सदस्यांनी मंगळवारी विजयादशमीचा आनंद हवेत गोळीबार करून साजरा केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

विजयादशमीला रा. स्व. संघातील सदस्यांनी रायफल आणि पिस्तुलाच्या सहाय्यानं हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

सीतापूरचे सहाय्यक पोलीस अधिक्षक मधुबन प्रताप सिंह यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून गोळीबार करण्यामध्ये सहभागी असणाऱ्यांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती दिली आहे.

राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे सदस्य विजयादशमी दिवशी दरवर्षी शस्त्रांची पूजा केली जाते. अशा प्रकारच्या एका कार्यक्रमामध्ये रा. स्व. संघ प्रमुख मोहन भागवतही सहभागी होत असतात.

सीतापूरमधील राष्ट्रीय स्वयं सेवक संघाच्या सदस्यांनी हवेत गोळीबार केल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली आहे. या व्हिडिओमध्ये आरएसएसचा ड्रेसकोड घातलेले दोन तरुण रायफल आणि पिस्तुलातून हवेत गोळीबार करताना दिसत आहेत. या प्रकरणाची उत्तर प्रदेश पोलिसांनी दखल घेतली असून चौकशीचे आदेश देणार असल्याची माहिती दिली.

वरातीत तरुणाने फटाके नाही तर पिस्तुलाने केला हवेत गोळीबार

करदामपुरी इथे लग्न समारंभात पिस्तुलाने हवेत गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी लग्नाच्या वरातीमध्ये हवेत गोळीबार करून आनंद साजरा करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

बंदुकबाज नेता...भाजपच्या आणखी एका नेत्याचा खुलेआम हवेत गोळीबार

हरिद्वारमध्ये भाजपचे नेते अनेक कारणांनी चर्चेत आले आहेत. त्यापैकी एका नेत्याने रायफलमधून खुलेआम हवेत गोळीबार केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फायरिंग करत असलेले भाजप नेते हे कुलदीप चौधरी असल्याची माहिती मिळत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 9, 2019, 2:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading