मराठी बातम्या /बातम्या /देश /निशांतची झाली निशा! ट्रान्सजेंडर वयात येण्याचा सोहळा थाटामाटात साजरा; आई-बाबांनीच केलं आयोजन

निशांतची झाली निशा! ट्रान्सजेंडर वयात येण्याचा सोहळा थाटामाटात साजरा; आई-बाबांनीच केलं आयोजन

‘निशांत’ ला ‘निशा’ म्हणून ओळख देऊन या सोहळ्यात सगळ्या प्रथा नातेवाईंकांनी पार पाडल्या.

‘निशांत’ ला ‘निशा’ म्हणून ओळख देऊन या सोहळ्यात सगळ्या प्रथा नातेवाईंकांनी पार पाडल्या.

‘निशांत’ ला ‘निशा’ म्हणून ओळख देऊन या सोहळ्यात सगळ्या प्रथा नातेवाईंकांनी पार पाडल्या.

    चेन्नई, 7 मार्च : मुलगी वयात आली, तिची पाळी सुरु झाली की आपल्याकडे एक सोहळा करण्याची प्रथा आहे. अजूनही दक्षिण भारतात ही प्रथा विशेषकरुन पाळली जाते. तमिळनाडूतही असाच एक सोहळा (Puberty Function) झाला. पण तो झाला एका ट्रान्सजेंडरचा (Transgender) म्हणजे मुलाकडून मुलीकडे असा प्रवास झालेल्या निशांत उर्फ निशाच्या वयात येण्याचा हा सोहळा होता..आणि महत्त्वाचं म्हणजे हा सोहळा निशांतच्या पालकांनी आयोजित केला होता. या सोहळ्याला निशाचे कुटुंबीय, नातेवाईक, शेजारी-पाजारी, शाळेतले मित्र यांच्यासह अन्य अनेकजण आवर्जून उपस्थित होते.

    आश्चर्य वाटायला लावणारी आणि काळानुरुप कसं चाललं पाहिजे हे शिकवणारी ही घटना आहे तमिळनाडूतील. तमिळनाडूच्या (TAmilnadu) कुड्डलोर जिल्ह्यातील विरुद्धाचलम इथं राहणाऱ्या कोलांची आणि अमुथा यांची ही 21 वर्षांची मुलगी आहे, निशा. पण तिचा जन्म झाला निशांत म्हणून म्हणजेच मुलगा म्हणून ती जन्माला आली होती. कोलांची एका दुकानात काम करतात तर अमुथा सफाई कामगार आहे. निशानं केटरिंगमध्ये डिप्लोमापर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. मोठं होताना आपल्यात काहीतरी वेगळं आहे हे निशांतला जाणवत होतं. मात्र त्यावेळेस त्याच्या आईवडिलांनी त्याला वाळीत टाकलं, त्याचा विरोध केला. त्यानं घर सोडलं आणि काही दिवस तृतीयपंथीयांकडे आश्रय घेतला. आता काही वर्षांनंतर त्याच्या आईवडिलांचं मन बदललं आणि त्यांनी निशांतला परत घरी बोलवलं. इतकंच नाही तर त्यांनी त्याचं नाव बदललं आणि तिच्या वयात येण्याचा सोहळाही साजरा केला.

    ‘निशांत’ ला ‘निशा’ म्हणून ओळख देऊन या सोहळ्यात सगळ्या प्रथा नातेवाईंकांनी पार पाडल्या. या वेळेस त्याचे कुटुंबीय, नातेवाईक, शेजाऱ्यांबरोबरच त्याचे शाळकरी मित्रमैत्रिणीही उपस्थित होत्या. “माझ्यातील बदल आणि भावना समजून घेऊन त्याचा आदर करणारे पालक आणि नातेवाईक मला मिळाले याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजते. आपल्या मुलांच्या इच्छेचा आदर करा अशी विनंती मी सर्व पालकांना करते,” अशा भावना निशानं News18 शी बोलताना व्यक्त केल्या.

    हे ही वाचा-1 मार्क वाढवण्यासाठी 3 वर्ष संघर्ष; बोर्डाने उत्तर न दिल्यानं कोर्टात गेला अन्..

    काही महिन्यांपूर्वी चेन्नईतील एका तृतीयपंथीयांची पोस्ट व्हायरल झाली होती. या पोस्टमुळे एका ट्रान्सवुमनला उद्योजिका (Transwoman Enterprenuer) म्हणून स्थिर व्हायला मदत झाली होती. शायना बानू (Shaina Banu) या ‘ट्रान्सजेंडर टेस्टी हट’ (Transgender Tastey Hut) या नावाने चेन्नईतील एगमोअरजवळ खाद्यपदार्थांचा स्टॉल चालवतात. पण ग्राहक अजिबातच फिरकत नसल्याने त्या खूपच निराश झाल्या होत्या. मात्र त्यांची फेसबुक पोस्ट व्हायरल झाल्यावर लोकांनी त्या उपहारगृहात भरपूर गर्दी करायला सुरुवात केली. त्यानंतर तिनं या पाठिंब्याबद्दल सगळ्यांचे आभार मानले. तिनं पेसबुक पोस्टमध्ये लिहीलं होतं , ‘ हे उपहारगृह एखाद्या पुरुष किंवा स्त्रीकडून चालवलं जात असतं, तर समाजातील लोकांनी नक्कीच त्याला प्रतिसाद दिला असता. पण तुम्ही लोक एका तृतीयपंथीयानं चालवलेल्या उपहारगृहात याल का ? मग आम्ही कष्ट करून पैसे कमवत नाही असा आरोप हा समाज आमच्यावर का करतो?’ असा सवाल तिनं या पोस्टमधून विचारला होता. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि यूट्युबर्सनं तिथं आवर्जून भेट दिली आणि ट्रान्सजेंडर टेस्टी हट लोकप्रिय झालं. संपूर्ण राज्यातील कानाकोपऱ्यांतून आता तिथं ग्राहक आवर्जून भेट देतात.

    First published:
    top videos

      Tags: Chennai, Tamil nadu, Transgender