13 जानेवारी : जम्मू-काश्मीरच्या सीमेवर पुन्हा एकदा पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. सुंदरबनी सेक्टरमध्ये गोळीबारात धुळ्याचे जवान लान्सनायक योगेश मुरलीधर भदाणे शहीद झाले आहे.
शनिवारी सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानने भारतीय चौकीवर गोळीबार केला. भारतीय सैन्यानेही जशाच तसे उत्तर दिले. मात्र या गोळीबारात लान्सनायक योगेश मुरलीधर भदाणे जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.
28 वर्षीय लान्सनायक योगेश भदाणे हे धुळ्यातील खळाणे गावातील रहिवासी आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि परिवार आहे. योगेश मुरलीधर भदाणे हे बहादुर सैनिक होते. देश त्यांच्या बलिदानाने कायम आभारी राहिली असं भारतीय लष्कराने पत्रकात म्हटलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jamu kashmir, Yogesh bhadane