Elec-widget

हवाई हल्ल्यानंतर पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारताच्या कारवाईत पाकचा 1 सैनिक ठार

हवाई हल्ल्यानंतर पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारताच्या कारवाईत पाकचा 1 सैनिक ठार

भारतीय हवाई दलाच्या कारवाईनंतर पाकिस्ताननं जम्मूतील कानाचक्क येथे शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं.

  • Share this:

श्रीनगर, 26 फेब्रुवारी : पाकच्या नाकावर टिच्चून भारताच्या हवाई दलानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्ना केला. यामध्ये तब्बल 200 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तर, 5 पाकिस्तानी जवान ठार झाले. या हल्ल्यामुळे दहशतवाद्यांना पळता भूई थोडी झाली. शिवाय, पाकिस्ताननं भारतीय हवाई दलाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण, भारताचं चक्रव्यूह त्यांना काही भेदता आलं नाही. त्यामुळे भारताला जशास तसे उत्तर देण्याची भाषा करणारा पाकिस्तान रागानं लालेलाल झाला.

भारतीय हवाई दलाच्या कारवाईनंतर पाकिस्ताननं जम्मूतील कानाचक्क येथे शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. त्याला भारतानं देखील चोख प्रत्यत्तर दिलं असून यामध्ये पाकचा एक सैनिक ठार तर, एक सैनिक जखमी झाला. यानंतर आता सीमेवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

असा झाला Air Srrike

पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी भारतीय वायु दलाच्या मिराज - 2000 या विमानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश करत दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. यामध्ये 200 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारतीय वायु दलानं केलेल्या कारवाईमुळे दहशतवाद्यांना पळता भूई थोडी झाली. या हल्ल्यामध्ये 5 पाकिस्तानी सैनिक देखील ठार झाले. तर जखमींवर रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. 21 मिनिटं भारतीय हवाई दलानं केलेल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांच्या तळाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं.प्रत्युत्तरादाखल पाकनं भारतीय हवाई दलावर हल्ला केला. पण, भारतीय हवाई दलापुढे त्यांची डाळ शिजली नाही

मसूद अझरचा मेव्हणा ठार?

Loading...

पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय हवाई दलानं जैश ए मोहम्मदच्या तळाला लक्ष्य केलं. हवाई दलानं जैशच्या ज्या तलावर कारावाई केली तो तळ जैश ए मोहम्मदचा म्होरक्या अझर मसूदचा मेव्हणा मौलाना युसूफ अझर लीड करत होता. या हल्ल्यामध्ये 200 दहशतवादी ठार झाले असले तरी मौलाना युसूफ अझर ठार झाला की नाही? याबद्दल अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भारतीय हवाई दलाच्या कारवाईबद्दल माहिती देण्यात आली.


पाकची पहिली प्रतिक्रिया


'भारतीय वायूसेनेच्या विमानांनी नियंत्रण रेषा ओलांडून 3 ते 4 मैल आतमध्ये प्रवेश केला होता. पण त्यांनी केलेल्या हल्ल्यात कोणतंही नुकसान झालेलं नसून कोणीही जखमी झालेलं नाही,' असं ट्वीट करत पाकिस्तानने आपली प्रतिक्रिया दिली आहे.


IndiaStrikeBack : परराष्ट्र सचिवांची UNCUT पत्रकार परिषद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 26, 2019 12:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...