मराठी बातम्या /बातम्या /देश /

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, जवान शहीद

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, जवान शहीद

पाकिस्ताननं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे.

पाकिस्ताननं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे.

पाकिस्ताननं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे.

श्रीनगर, 21 मार्च : पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. सुंदरबन सेक्टर परिसरात झालेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला आहे. यापूर्वी देखील पाकिस्ताननं अनेकवेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. पुलावामा हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. दरम्यान, सकाळी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये 2 पोलीस कर्मचारी जखमी झाले होते.

लष्कर आणि दहशतवाद्यामध्ये चकमक

काश्मीरमधील वॉरपोरा सोपोर येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. दरम्यान, लष्करानं दहशतवाद्याला घेरलं असून त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगितलं. पण, दहशतवाद्यानं आत्मसमर्पण करण्यास नकार दिला. सध्या या भागात फायरिंग सुरू आहे. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्करानं दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास कठोर पावलं उचलली आहेत. मागील काही दिवसांमध्ये टॉपच्या कमांडरचा खात्मा देखील लष्करानं केला आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना शोधून मारलं जात असून सुरक्षेची पूर्ण काळजी घ्या असे आदेश आता जवानांना देण्यात आले आहेत. घरांमध्ये लपून राहत दहशतवादी लष्कराला लक्ष्य करत आहेत. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. जैश-ए-मोहम्मदनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

लष्कर आणि दहशतवाद्यामध्ये चकमक

हाय अलर्ट जारी

पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यानंतर देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दहशतवादी मोठा घातपात करण्याच्या तयारीमध्ये असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली. त्यानंतर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. काश्मीर व्यतिरिक्त देशातील प्रमुख भागांमध्ये घातपाती कारवाया करण्याचा दहशतवाद्यांचा प्लॅन आहे. त्याच धर्तीवर सध्या देशातील प्रमुख ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारतानं एअर स्ट्राईक करत 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव

पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. भारतानं केलेल्या कारवाईमुळे पाकिस्ताननं देखील उत्तर देण्याची भाषा केली. दरम्यान, दोन्ही देशांकडून सीमेवर अतिरिक्त सैनिक तैनात करण्यात आले आहेत. तर, इम्नान खान यांनी दहशतवादी संघटनांवर कारवाई करू असं आश्वासन दिलं आहे.

VIDEO: होळीमध्ये मसूद अझहरचा 25 फुटांचा पुतळा जाळून शहिदांना श्रद्धांजली

First published:

Tags: Pulwama, Terror attack