पाकिस्तानकडून भारतीय चौक्यांवर फायरिंग; भारताचंही चोख प्रत्युत्तर

पाकिस्तानकडून भारतीय चौक्यांवर फायरिंग; भारताचंही चोख प्रत्युत्तर

पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असून भारतीय सैनिकदेखील त्याला चोख प्रत्युत्तर देत आहेत.

  • Share this:

श्रीनगर, 28 फेब्रुवारी : भारताच्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन करायला सुरुवात केली आहे. 26 फेब्रुवारी रोजी भारतानं पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्धवस्त केले. त्यानंतर पाकिस्तानच्या सैन्यानं भारतीय चौक्यांना लक्ष्य करायला सुरुवात केली. सकाळी देखील पाकिस्ताननं कृष्णा घाटीमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय चौक्यांना लक्ष्य केलं. दरम्यान, भारतानं पाकला सडेतोड उत्तर दिले. त्यानंतर पाकिस्ताननं मेढरमधील बलनोई येथे भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. त्याला देखील भारतानं चोख प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे.

14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले. त्यानंतर भारतानं दहशतवाद्यांसह पाकिस्तानला देखील इशारा दिला. दरम्यान, भारतीय हवाई दलानं एअर स्ट्राईक करत जवळपास 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा केला. परिणामी पाकनं आम्ही देखील प्रत्युत्तर देऊ अशी भाषा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही दलाच्या प्रमुखांना कारवाईबाबतचे सर्व अधिकार दिले आहेत.

पाकची जैशवर कारवाई

भारतानं पाकिस्तानच्या नाड्या आवळायला सुरुवात करताच पाकिस्तान आता वठणीवर येऊ लागला आहे. बुधवारी दिवसभर दोन्ही देशांमध्ये मोठा तणाव दिसून आला. दरम्यान, बुधवारी भारतानं जैश ए मोहम्मदचा पुलवामा हल्ल्यात सहभागासंदर्भातील फाईल्स पाकिस्तानला सोपवल्या. त्यानंतर बुधवारी रात्री पाकिस्ताननं जैश विरोधात कारवाई केल्याची माहिती न्यूज18च्या सूत्रांनी दिली आहे.

बडगाम विमान दुर्घटनेत सिद्धार्थचा मृत्यू, पत्नीसुद्धा आहे भारताच्या हवाई

पाकिस्तानची हवाई घुसखोरी

भारतानं एअर स्ट्राइक करत पाक व्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केलं. त्यानंतर पाकिस्तानी विमानांनी देखील भारताच्या हद्दीत घुसत आगळीक करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये पाकिस्तानचं mi-17 हे विमान भारतानं पाडलं. तर, मिग -27 हे विमान क्रॅश झाल्यानंतर पाकिस्तानच्या हद्दीत उतरलेले विंग कमांडर सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आहेत.

अभिनंदन यांची सुटका होणार?

'परिस्थितीतून तोडगा निघावा अशी आमची इच्छा आहे. वातावरण निवळलं की आम्ही ताब्यात घेतलेल्या भारतीय वैमानिकाला सोडण्याचा विचार करू,' असं विधान पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी केलं आहे. पाकिस्तानने अभिनंदन वर्थमान या वैमानिकाला बुधवारी ताब्यात घेतलं आहे.

युएनमध्ये प्रस्ताव

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मोठा धक्का बसला. कारण, अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्सनं संयुक्त राष्ट्रसंघामध्ये जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून घोषित करावे. शिवाय, जैशचा म्होरक्या अझहर मसूदला देखील आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करावे यासाठी प्रस्ताव मांडला आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये आश्रय घेतलेल्या या संघटनेसह पाकिस्तानच्या अडचणीमध्ये देखील आता वाढ होताना दिसत आहे.

SPECIAL REPORT : लादेनसारखाच मसूदचा पण होईल का खात्मा?

First published: February 28, 2019, 9:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading