आडवाणींनी केली होती शिफारस, मोदींनी 20 वर्षांनी पूर्ण केलं CDSचे वचन

आडवाणींनी केली होती शिफारस, मोदींनी 20 वर्षांनी पूर्ण केलं CDSचे वचन

लष्कर, नौदल आणि हवाई दल यांच्यात समन्वय रहावा यासाठी देशाच्या पहिल्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजेच CDSची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 डिसेंबर : लष्कर, नौदल आणि हवाई दल यांच्यात समन्वय रहावा यासाठी देशाच्या पहिल्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजेच CDSची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्रिमंडळाने चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदासाठी सुरक्षा प्रकरणाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या समीतीने स्वीकारला आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी केंद्रीय गृह मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा अहवाल सादर करण्यात  आला होता. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याशिवाय तीनही दलांचे प्रमुख उपस्थित होते.

देशाचे पहिले सीडीएस म्हणून सध्याचे लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांचे नाव आघाडीवर आहे. सीडीएस थेट पंतप्रधान कार्यालयाला अहवाल देतील आणि सुरक्षा प्रकरणाींवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीनही सुरक्षा दलांच्या वतीने सल्ला देतील.

1999 च्या कारगिल युद्धानंतर तत्कालिन उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रुप ऑफ मिनिस्टर्सनी चीफ ऑफ डिफेन्स पदाची शिफारस केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वातंत्र्यदिनी सीडीएस पद निर्माण करण्याबाबत घोषणा केली होती.

सध्या चीफ ऑफ स्टाफ कमिटीमध्ये लष्कर, नौदल आणि हवाईदल प्रमुखांचा समावेश असतो. यामधील सर्वात वरिष्ठ सदस्य अध्यक्ष असतात. धनोआ 31 मेपासून सीओएससीचे अध्यक्ष आहेत. या समितीच्या अध्यक्षांकडे तीनही सैन्यदलांमध्ये समन्वय राखण्याची जबाबदारी असते. देशासमोर असलेल्या सुरक्षेच्या आव्हानांना पेलण्यासाठी रणनिती तयार करण्याची जबाबदारी सीओएससीवर असते.

अमेरिका, चीन, युके, जपान यांच्यासह अनेक देशांकडे चीफ ऑफ डिफेन्स व्यवस्था आहे. नाटो देशांमधील सैन्यदलातही हे पद आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठ्या असलेल्या तसेच सीमेवर, सागरी किनाऱ्यावर सुरक्षेची आव्हाने पेलण्यासाठी भारताला अशा प्रकारच्या व्यवस्थेची आवश्यकता असल्याचं केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 24, 2019 04:52 PM IST

ताज्या बातम्या