Home /News /national /

CDS Bipin Rawat यांच्या हेलिकॉप्टर क्रॅशचं सत्य आलं समोर, अपघात नेमका कसा झाला?

CDS Bipin Rawat यांच्या हेलिकॉप्टर क्रॅशचं सत्य आलं समोर, अपघात नेमका कसा झाला?

helicopter crash

helicopter crash

सीडीएस बिपिन रावत(CDS General Bipin Rawat) यांच्यासह लष्करातील 14 अधिकारी असलेलं हेलिकॉप्टर क्रॅश होण्यामागचं मोठं कारण समोर आलं आहे.

  नवी दिल्ली, 2 जानेवारी: देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत (CDS General Bipin Rawat) यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत (Helicopter Crash) दुर्दैवी मृत्यू झाला होता. बिपिन रावत यांच्यासह लष्करातील (Army) 14 अधिकाऱ्यांना देशाने गमावले. झालेल्या अपघातानंतर हा अपघात का आणि कसा घडले? सर्व प्रोटोकॉल पाळले गेले का…? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. दरम्यान, हेलिकॉप्टर क्रॅशचं सत्य समोर आले आहे. अपघातानंतर हेलिकॉप्टर अपघाताच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी कोर्ट ऑफ इंक्वॉयरी गठित करण्यात आली होती. या तपासामध्ये मोठे कारणं समोर आले आहे. हेलिकॉप्टर खराब हवामानामुळं क्रॅश झाल्याचं समितीच्या चौकशीतून समोर आलं आहे. लष्कराच्या बड्या अधिकाऱ्यांना घेऊन हवाई दलाचं IAF Mi-17V5 हेलिकॉप्टर कर्नाटक-तामिळनाडू सीमेवरील कुन्नूरकडे जात होतं. यामध्ये सीडीएस बिपीन रावत, त्यांची पत्नी, त्यांचा स्टाफसह भारतीय सैन्यदलातील बडे अधिकारी होते. 14 जण या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. मात्र दुपारी साडेबाराच्या सुमारास खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले.

  अहवालाबाबत अद्याप अधिकृत माहिती नाही

  हेलिकॉप्टर क्रॅशच्या कारणांचा तपास करत असलेल्या कमिटीनं 'खराब हवामानामुळे वैमानिक 'विचलित' झाले असावेत, ज्यामुळे हा अपघात झाला.' असे म्हटले आहे. मात्र, वायुसेनेच्या वतीनं अहवालाबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही. बिपीन रावत हे आपल्या पत्नीसह वेलिंगटन येथे एका कार्यक्रमासाठी जात होते. त्यावेळी त्यांच्यासोबत लष्कराचे वरिष्ठ अधिकारीही सोबत होते. वेलिंगटनमध्ये आर्मीचं कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये सीडीएस बिपीन रावत यांचे लेक्चर नियोजित होतं. वेलिंगटनवरुन कुन्नूरला जाताना हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, एअर मार्शल मानवेंद्र सिंह कमिटीने आपली चौकोशी पूर्ण केली असून कायदेशीर सल्ला घेण्यासाठी कायदा विभागाकडे पाठवले आहे. लवकरच यासंदर्भातील अहवाल वायुसेना प्रमुखांकडे पाठविण्यात येणार आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: Indian army

  पुढील बातम्या