Home /News /national /

BREAKING: जनरल बिपीन रावत यांचे भाऊ भाजपमध्ये सामील

BREAKING: जनरल बिपीन रावत यांचे भाऊ भाजपमध्ये सामील

भारताचे पहिले CDS जनरल बिपीन रावत यांचं गेल्या महिन्यात हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं. उत्तराखंड निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या धाकट्या भावाने आता भाजपत प्रवेश केला आहे.

    नवी दिल्ली, 19 जानेवारी: भारताचे पहिले सैन्यदल प्रमुख (Chief of Defence staff)CDS जनरल बिपीन रावत यांचं गेल्या महिन्यात हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं. त्यांचे धाकटे बंधू विजय रावत यांनी आता राजकारणात प्रवेश करत भाजपमध्ये सामील व्हायचा निर्णय घेतला आहे. उत्तराखंडच्या निवडणुकीपूर्वी विजय रावत भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील, अशी चर्चा होती. त्याप्रमाणे दिल्लीत बुधवारी त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. वडीलबंधूप्रमाणेच विजय रावत हेसुद्धा भारतीय लष्करात अधिकारी होती. कर्नलपदावरून ते निवृत्त झआले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंता करत त्यांनी संधी दिल्याबद्दल आभारही मानले. कर्नल  (निवृत्त) रावत  यांनी भाजपच्या नेत्यांच्या उपस्थितीत दिल्लीत पक्षप्रवेश केला. रावत  यांच्या परिवार भाजपशी जवळचा होता, असं दिसतं. कर्नल (निवृत्त) विजय रावत यांच्या सांगण्यानुसार त्यांचे वडीलही भाजपसाठी काम करत असत. "आता मला पक्षासाठी काम करायची संधी मिळाली आहे", असं विजय रावत म्हणाले. रावत यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी मंचावर उपस्थित होते. उत्तराखंड निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावत यांना पक्षात सामील करून घेतल्याने भाजपला फायदा होऊ शकतो. रावत यांचे वडील लष्करात होते. मोठे भाऊ जनरल बिपीन रावत लष्करप्रमुख आणि नंतर पहिले CDS सुद्धा झाले. 8 डिसेंबर 2021 रोजी तामिळनाडूतल्या कुन्नूर इथे झालेल्या  हेलिकॉप्टर दुर्घटनेत देशाचे चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपीन रावत (CDS Bipin Rawat) यांचं निधन झालं. या हेलिकॉप्टर अपघात प्रकरणाची हवाई दलाच्या मार्फत चौकशी करण्यात आली आहे. हेलिकॉप्टरच्या बॉक्समधील संवाद आणि वस्तुस्थितीनुसार पुरावे तपासण्यात आले. हेलिकॉप्टरमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड झाला नव्हता, खराब हवामानामुळेच हा अपघात झाल्याचा निष्कर्ष कोर्ट ऑफ एन्क्वायरीने (PRELIMINARY FINDINGS OF COI) काढला आहे.
    First published:

    Tags: Army

    पुढील बातम्या