Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /देश /

'सीडीएस बिपीन रावत गंभीर जखमी होते, पिण्यासाठी पाणी मागत होते', दुर्घटना पाहिलेल्या प्रत्यक्षदर्शीचा दावा

'सीडीएस बिपीन रावत गंभीर जखमी होते, पिण्यासाठी पाणी मागत होते', दुर्घटना पाहिलेल्या प्रत्यक्षदर्शीचा दावा

"सीडीएस बिपीन रावत आज आमच्यात नाहीत या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नाहीय. मी जेव्हा त्यांना पाहिलं तेव्हा ते जिवंत होते. काश मी त्यांच्यासाठी काही करु शकलो असतो", असा दावा एका प्रत्यक्षदर्शीने केला आहे.

"सीडीएस बिपीन रावत आज आमच्यात नाहीत या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नाहीय. मी जेव्हा त्यांना पाहिलं तेव्हा ते जिवंत होते. काश मी त्यांच्यासाठी काही करु शकलो असतो", असा दावा एका प्रत्यक्षदर्शीने केला आहे.

"सीडीएस बिपीन रावत आज आमच्यात नाहीत या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नाहीय. मी जेव्हा त्यांना पाहिलं तेव्हा ते जिवंत होते. काश मी त्यांच्यासाठी काही करु शकलो असतो", असा दावा एका प्रत्यक्षदर्शीने केला आहे.

  • Published by:  Chetan Patil

नवी दिल्ली, 10 डिसेंबर : तामिळनाडूच्या (Tamilnadu) कुन्नूर येथे झालेल्या भीषण हेलिकॉप्टर दुर्घटनेत (Coonoor Helicopter crash) भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत (CDS Bipin Rawat) यांचं निधन झालं. या अपघातात बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत (Madhulika Rawat) यांच्यासह एकूण 13 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेप्रकरणी तपासाला सुरुवात झाली असून या संबंधित आता वेगवेगळी माहिती समोर येऊ लागली आहे. हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर काही नागरिक समोर आले होते जे घटनास्थळी लवकर पोहोचले होते. यापैकी एका प्रत्यक्षदर्शीने धक्कादायक खुलासा केला. एका प्रत्यक्षदर्शीने 'एनडीटीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत दावा केलाय की, त्याने बिपीन रावत यांना पाहिलं होतं. पण तो त्यांना ओळखू शकला नाही. रावत हे दुर्घटनेनंतर गंभीर जखमी झाले होते आणि ते पाणी मागत होते, असा दावा त्या प्रत्यक्षदर्शीने केला आहे. या प्रत्यक्षदर्शीचं शिवकुमार असं नाव आहे.

शिवकुमार नेमकं काय म्हणाला?

"मी चहाच्या बागेत काम करणाऱ्या माझ्या भावाला भेटण्यासाठी निलगिरी टेकडीवर गेलो होतो. तेव्हा एक हेलिकॉप्टर पेट घेतलेल्या अवस्थेत खाली पडताना दिसलं. जिथे ते हेलिकॉप्टर पडलं होतं त्या ठिकाणी पहोचणं खूप अवघड होतं. मी सुरुवातीली हेलिकॉप्टरमधून पेट घेतलेले तीन माणसं खाली पडताना पाहिली होती. पण जेव्हा घटनास्थळी पोहोचलो तेव्हा दोन मृतदेह हे हेलिकॉप्टरच्या बाजूला पडलेले होते", असं शिवकुमारने सांगितलं.

हेही वाचा : हेलिकॉप्टर अपघातातील मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला अपघात; अनेक पोलीस जखमी

'पाणी मागणारे बिपीन रावत होते ते नंतर समजलं'

"या दरम्यान, तिथे एक व्यक्ती जिवंत होता. त्या व्यक्तीला ओळखणं फार कठीण होतं. आम्ही त्यांना सांगितलं की, सगळं ठीक होईल. काळजी करु नका. तेव्हा त्या व्यक्तीने आमच्याकडे पिण्यासाठी पाणी मागितलं. मात्र, आमच्याकडे तेव्हा त्यांना देण्यासाठी पिण्याचं पाणी नव्हतं. त्यानंतर एक टीम त्यांना घेऊन गेली. नंतर जेव्हा मला फोटो दाखवण्यात आला तेव्हा मला माहिती पडलं की, ते सीडीएस बिपीन रावत हे होते जे आमच्याकडून पणी मागत होते", असा दावा शिवकुमारने केला.

हेही वाचा : अचानक इंजिनचा आवाज बंद झाला अन्..; CDS बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघातापूर्वीचा पहिला LIVE VIDEO

'मला रात्रभर झोप लागली नाही'

"या घटनेमुळे मी खूप अस्वस्थ झालोय. या घटनेचा माझ्या मनावर एवढा खोलवर प्रभाव पडलाय की रात्रभर मला झोपसुद्धा लागली नाही. ज्या व्यक्तीने आपलं संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी समर्पित केलं त्या व्यक्तीला शेवटच्या क्षणी प्यायला पाणीही मिळू शकलं नाही. हा विचार करुन मी रात्रभर झोपू शकलो नाही. रावत आज आमच्यात नाहीत या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नाहीय. मी जेव्हा त्यांना पाहिलं तेव्हा ते जिवंत होते. काश मी त्यांच्यासाठी काही करु शकलो असतो", असं शिवकुमार म्हणाला.

First published:

Tags: Tamil nadu