कोयंबटूर, 24 जुलै: तमिळनाडूतील कोयंबटूर इथे ओव्हरटेक करण्याच्या नादात बस चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ती बस एका बाजूला कलंडली. शेजारून जात असणाऱ्या कारवर ती बस कोसळणार तोच चालकानं मोठा शर्थीनं नियंत्रण मिळवलं आणि बस थांबली. श्वास रोखून ठेवायला लावणारी ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.