ऊना, 24 जून : ट्रकखाली चिरडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हिमाचल प्रदेशातील ऊना मुख्यालयाच्या मुख्य चौकात हा भीषण अपघात घडला आहे. हा भीषण अपघाताचा संपूर्ण व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. त्याचबरोबर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून तपास सुरू केला.
मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा मुख्यालयाच्या ट्रॅफिक लाइट चौकात ट्रकच्या धडकेत 85 वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. संपूर्ण अपघात सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. अरविंद मार्गावर राहणाऱ्या बलवीरसिंग पुत्र साहिब दत्ता असं मृताचं नावं आहे.
हे वाचा-
हायवेवर गाडी चावलत असतानाच दिसला साप, महिलेनं चालत्या गाडीतून मारली उडी आणि....
मयत हा निवृत्त एसडीओ असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी स्थानिक रुग्णालय ऊना इथे पाठवण्यात आला आहे. ट्रकचालकाविरोधा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
मंगळवारी संध्याकाळी बलवीरसिंग दुचाकीवरून घरी जात असताना ट्रकनं त्यांना चिरडलं. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांनी बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा अपघात कैद झाला.
संपादन- क्रांती कानेटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.