Home /News /national /

धावत ट्रेन पकडायला गेली महिला; हात सुटला अन्... RPF जवानानं देवदुतासारखं वाचवलं; पाहा थरारक VIDEO

धावत ट्रेन पकडायला गेली महिला; हात सुटला अन्... RPF जवानानं देवदुतासारखं वाचवलं; पाहा थरारक VIDEO

ट्रेन स्टेशनवरच्या CCTV कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. चातल्या ट्रेनमध्ये ती महिला चढली खरी पण हात निसटला आणि ती ट्रेनखाली आली. प्लॅटफॉर्मवरच्या जवानानं तिला वेळीच खेचलं म्हणून.. VIDEO पाहून अंगावर येईल काटा..

    नवी दिल्ली, 31 जुलै: गाडी सुटली, थोडक्यात गाडी चुकेल म्हणून महिला धावत सुटली. गाडीचा वेग अद्याप वाढलेला नव्हती. ती चालत्या गाडीत पटकन दांडा पकडत चढलीसुद्धा. पण तिचा हात सटकला आणि ती थेट गाडीखाली जाऊ लागली. प्लॅटफॉर्मवर असलेल्या RPF जवानाने ते पाहिलं आणि पुढचा मागचा विचार न करता त्या महिलेला वाचवायला तो धावला. जवानाने त्या महिलेला अक्षरशः खेचून वर काढलं. आरडाओरडला झाल्याने ट्रेनमधल्या लोकांनीही ट्रेन थांबवायचा इशारा केला असावा. ही सगळी घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. धावत्या ट्रेनमध्ये चढणं कसं जिवावर बेतू शकतं हे या VIDEO वरून कळेल. तो जवान देवदुतासारखा धावला म्हणूनच केवळ त्या बाईचे प्राण वाचले. तेलंगणाच्या सिकंदराबाद स्टेशनवरची ही घटना आहे. स्टेशनवर लावलेल्या CCTV कॅमेऱ्यामुळे ती समोर आली. या VIDEO मध्ये दिसतं की एक महिला प्लॅटफॉर्मवरून चालत आहे. तेवढ्यात ट्रेन स्टेशनवरून सुटते. महिला धावत ती ट्रेन पकडायचा प्रयत्न करते. पकडतेही. पण तेवढ्यात तिचा तोल जातो. पाय घसरतो आणि ती खाली पडते. 9 वर्षांच्या चिमुरडीनं पुस्तकं गोळा करून कॅन्सरग्रस्तांसाठी सुरु केलं वाचना तिथे उपस्थित आरपीएफ कॉन्स्टेबल तातडीने तिथे धाव घेत महिलेला प्लॅटफॉर्मच्या दिशेने खेचताना दिसत आहे. ही घटना शुक्रवार 30 जुलैची असल्याचं ANI च्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. सोशल मीडियावर ही घटना या VIDEO मुळे VIRAL झाली आहे. लोक या जवानाचं कौतुक करत आहेत. त्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आणि धाडसामुळेच त्या महिलेचा जीव वाचला. पण धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करू नये, हेही या video तून कळेल.
    First published:

    Tags: Cctv, Telangana, Train, Train accident, Viral video.

    पुढील बातम्या