Home /News /national /

जम्मूत दहशतवाद्यांचा CISF बसवर हल्ला, चकमकीचं Live Footage कॅमेऱ्यात कैद

जम्मूत दहशतवाद्यांचा CISF बसवर हल्ला, चकमकीचं Live Footage कॅमेऱ्यात कैद

शुक्रवारी पहाटे दहशतवाद्यांनी (terrorists) बसवर ग्रेनेडने कसा हल्ला केला हे स्पष्टपणे दिसून येते. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये प्रथम एक मोटारसायकल येताना दिसत आहे.

    जम्मू, 23 एप्रिल: सुंजवान चकमकीचं (Sunjwan encounter) सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage) समोर आलं आहे. या व्हिडिओत शुक्रवारी पहाटे दहशतवाद्यांनी (terrorists) बसवर ग्रेनेडने कसा हल्ला केला हे स्पष्टपणे दिसून येते. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये प्रथम एक मोटारसायकल येताना दिसत आहे, जी बॅरिकेड ओलांडल्यानंतर रस्त्याच्या एका बाजूला थांबते. काही सेकंदांनंतर सीआयएसएफ जवानांना घेऊन जाणारी सीआयएसएफ बस बॅरिकेडजवळ पोहोचताच दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. त्यांच्या हल्ल्यानंतर लगेच गोळीबार सुरू होतो. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील एएसआय एसपी पटेल शहीद झाले, तर दोन पोलीस कर्मचार्‍यांसह 10 सीआयएसएफ जवान जखमी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्मू दौऱ्याच्या दोन दिवस आधी दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. मात्र, या चकमकीत सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मदचे दोन्ही दहशतवादी ठार झाले आहेत. सुंजवान लष्करी भागातील जलालाबादमध्ये शुक्रवारी पहाटे दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. सुरुवातील त्याने सीआयएसएफ जवानांनी भरलेल्या बसवर ग्रेनेड फेकले आणि नंतर पुढे उभ्या असलेल्या जिप्सीवर अंदाधुंद गोळीबार केला. हा परिसर मुस्लिमबहुल आहे आणि थोड्याच अंतरावर सुंजवान ब्रिगेड आणि एक CISF आस्थापना आहे. ठार झालेले दोन्ही पाकिस्तानी दहशतवादी फिदाईनच्या हल्ल्यात होते. शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजता दहशतवादी बरमिनीच्या दिशेने मार्गस्थ झाले. ते मुख्य रस्त्यावर आले आणि CISF च्या आस्थापनाकडे जात होते. तेव्हा दहशतवाद्यांनी आधी ब्लॉकवर सीआयएसएफच्या बसवर ग्रेनेड फेकले आणि नंतर गोळ्या झाडून अंदाधुंद गोळीबार केला. गोळीबार टाळण्यासाठी चालकाने लगेच बस मागे वळवली. दरम्यान, जिप्सीमध्ये उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. यामुळे दहशतवादी जीव मुठीत घेऊन पळाले आणि शेजारील सामानाच्या दुकानाच्या मागे असलेल्या घरात लपले. गोळीबाराचा आवाज ऐकून जवळच गस्त घालणारे लष्कराचे जवानही पोहोचले. पोलीस, सीआरपीएफ आणि सीआयएसएफच्या इतर तुकड्याही घटनास्थळी पोहोचल्या. या हल्ल्यात मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील एएसआय एसपी पटेल शहीद झाले आणि दोन पोलिसांसह 10 सीआयएसएफ जवान जखमी झाले. सर्वांना जीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Jammu and kashmir, Terrorist attack

    पुढील बातम्या