देशाला आता 'त्या' धारावी पॅटर्नची गरज, CCMB प्रमुखांनी दिला सल्ला

देशाला आता 'त्या' धारावी पॅटर्नची गरज, CCMB प्रमुखांनी दिला सल्ला

कोरोनाचा सामना करण्यासाठी करावं लागणार 'हे' काम, तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला सल्ला.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 जुलै : देशात कोरोनाबाधितांचा (Coronavirus) आकडा 6 लाखांच्या घरात गेला आहे. तर, देशात आतापर्यंत 89 लाख जणांची चाचणी करण्यात आली आहे. मात्र सेंटर फॉर सेल्युलर अॅण्ड मॉलिक्यूलर बायोलॉजीचे (CCMB) प्रमुख राकेश मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाचा सामना करण्यासाठी भारताला चाचणी क्षमता जवळपास 10 पट वाढवण्याची गरज आहे. सोमवारी तेलंगणाच्या राज्यपाल तमिलासाई सुंदरराजन आणि इतरांसह व्हिडिओ कॉन्फरन्स दरम्यान त्यांनी हे सांगितले.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 10 ते 14 जून दरम्यान, देशभरात दररोज 1.15 लाख ते 1.5 लाख लोकांची चाचणी केली जात आहे. मिश्रा म्हणाले की, 'ही (चाचणी) एक लाखाहून अधिक असली पाहिजे आणि दररोज दहा लाख लोकांची चाचणी करण्याची गरज आहे.'

वाचा-पुण्यात कोरोनाची परिस्थिती आणखी चिंताजनक, 24 तासातील रेकॉर्डब्रेक आकडेवारी समोर

मुंबईतील धारावीत सर्वात जास्त चाचणी

इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार मिश्रा म्हणाले की, 'ज्या प्रकारे मुंबईच्या धारावीमध्ये जास्तीत जास्त लोकांची चाचणी करून कोरोनावर नियंत्रण आणण्यात आले, तशीच परिस्थिती संपूर्ण देशात हवी'. मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार 10 लाख वेगवेगळ्या चाचणी तंत्रांचा वापर करून हे करणं शक्य आहे. आरटी पीसीआर पद्धतीत, जर सर्व काही काळजीपूर्वक केले गेले तर 8 तासांत रिपोर्ट येतील. आरएनए वेगळे करण्याच्या प्रक्रियेस बराच वेळ लागतो. त्यामुळे निकाल लागण्यास निम्म्याहूनही कमी वेळ लागतो.

वाचा-मुंबईतील 'या' 5 शहरांमध्ये आजपासून 10 दिवस कडक लॉकडाऊन! काय राहणार बंद?

'...तर देशातील मृतांची संख्या कमी होईल'

CCMB संचालक म्हणाले, 'CCMBसह अनेक प्रतिष्ठित संस्थांनी अशी मॉडेल्स विकसित केली आहेत. आम्ही आमच्या मॉडेलसाठी परवानगी शोधत आहोत. सरकार चाचणीसाठी पुढील पिढी तंत्रज्ञानाचा वापर देखील करू शकते, ज्यामध्ये एकाच वेळी 10 हजार चाचण्या केल्या जाऊ शकतात. मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, चाचणीची किंमतही हळूहळू कमी होईल. ते असेही म्हणाले की, देशात विषाणूचे धोकादायक किंवा धोकादायक असे कोणतेही प्रकार नाहीत आणि भारतीयांमध्ये एकूणच मृत्यूचे प्रमाण कमी आहे.

वाचा-रुग्णवाढीबरोबर पुण्यात कंटेन्मेंट झोनही वाढले, वाचा पूर्ण यादी

संपादन-प्रियांका गावडे.

First published: July 2, 2020, 9:16 AM IST

ताज्या बातम्या