CBSE : दहावी-बारावीच्या रखडलेल्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, असे होणार पेपर

CBSE : दहावी-बारावीच्या रखडलेल्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, असे होणार पेपर

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्धवट झाल्याने विद्यार्थी हवालदिल झाले होते. मात्र आता 1 ते 15 जुलैमध्ये या परीक्षा होणार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 मे : दहावी-बारावीच्या राहिलेल्या परीक्षा 1 जुलै ते 15 जुलै दरम्यान घेतल्या जाणार आहे. यासाठी आज या परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले. Coronavirus चा प्रादुर्भाव वाढल्याने परीक्षा थांबवण्यात आल्या होत्या. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्धवट झाल्याने विद्यार्थी हवालदिल झाले होते. परीक्षा होणार की नाही, इथपासून अनेक शंका त्यांच्या मनात होत्या. त्यामुळे मनुष्यबळविकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यात या परीक्षा घेणार असल्याचं जाहीर केलं आहे.

आज बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. असे असतील पेपर. या परीक्षांसाठी काही नियमही आखण्यात येणार आहेत. त्यानुसारच या परीक्षा घेतल्या जातील.

असे आहे बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक

महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा कोरोनाच्या संकटाआधीच पूर्ण झाली. पण दहावीची परीक्षा मात्र पूर्ण होऊ शकली नव्हती. एक पेपर राहिलेला असतानाच लॉकडाऊन सुरू झाल्याने दहावीचा भूगोलाचा पेपर राहिला होता. पण राज्य बोर्डाने भूगोलाची परीक्षा पुन्हा घेणार नसल्याचं आधीच जाहीर केलं आहे. हा पेपर आता होणार नाही. इतर विषयांच्या गुणावरून सरासरी गुण काढले जातील.

First published: May 18, 2020, 2:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading