भेटा CBSE च्या टॉपर मुलींना, एकीला व्हायचंय कथ्थक डान्सर!

भेटा CBSE च्या टॉपर मुलींना, एकीला व्हायचंय कथ्थक डान्सर!

CBSE ची टॉपर हंसिका शुक्लाला आयएएस होऊन प्रशासकीय सेवेत जायचं आहे. परराष्ट्र खात्यात अधिकारी बनण्याची तिची महत्त्वाकांक्षा आहे. मुझफ्फरनगरच्या करिश्मा अरोराचं यावरचं उत्तर मात्र सगळ्यांपेक्षा खूपच वेगळं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 6 मे : CBSE च्या परीक्षेत यावर्षीही मुलींनी बाजी मारली आहे. उत्तर प्रदेशातल्या दोन हुश्शार मुली या परीक्षेत पहिल्या आल्या आहेत. गाझियाबादची हंसिका शुक्ला आणि मुझफ्फरनगरमधली करिश्मा अरोरा या दोघींना विभागून पहिला नंबर देण्यात आला.

या दोघी विद्यार्थिनींनी 500 पैकी 499 गुण मिळवले आहेत. हंसिका आणि करिश्मा या दोघींचे गुण सारखे असले तरी पुढे काय करायचं या प्रश्नावर मात्र या दोघींची उत्तरं पूर्णपणे वेगळी आहेत.

हंसिकाला व्हायचंय IFS

हंसिकाला आयएएस होऊन प्रशासकीय सेवेत जायचं आहे. परराष्ट्र खात्यात अधिकारी बनण्याची तिची महत्त्वाकांक्षा आहे. मुझफ्फरनगरच्या करिश्मा अरोराचं यावरचं उत्तर मात्र सगळ्यांपेक्षा खूपच वेगळं आहे.

करिश्माला व्हायचंय डान्सर

करिश्माला कथ्थक डान्सर व्हायचं आहे आणि जगभरात ख्याती मिळवायची आहे.तिला अलीकडेच सांस्कृतिक मंत्रालयाची स्कॉलरशिप मिळाली आहे. तिने नृत्यामध्ये करिअर करण्यासाठी तिला उत्तर प्रदेश संगीत नाटक अकादमीनेही स्कॉलरशिप दिली आहे.

पापा कहते है...

करिश्मा अरोराचे वडील मनोज अरोरा यांना वाटतं, तिने मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला जावं पण तिने मात्र ठरवलं आहे. तिला जगप्रसिद्ध कथ्थक डान्सर होऊन देशाचं नाव मोठं करायचं आहे.

हंसिका शुक्लाने राज्यशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र अशा विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवले तर इंग्रजी विषयात तिला 99 गुण मिळाले आहेत. हंसिकाला बॅडमिंटन खेळायला आवडतं. गायन आणि नृत्य हेही तिचे छंद आहेत. ऑलराउंडर असलेल्या हंसिकाचं शिक्षकांनाही मोठं कौतुक आहे.

स्वप्नांना पंख हवे

हंसिका शुक्ला आणि करिश्मा अरोरा या दोघींनाही सगळ्यांनीच पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी मिळवलेलं हे यश करिअरचे मार्ग निवडण्यासाठीही त्यांना प्रेरणा देणार आहे.

==================================================================================

VIDEO अक्षरमंत्र- भाग 20 : अक्षरांच्या सरावानंतर आता अकांचा अभ्यास; आजचे अंक - ५, ६, ७, ८

First published: May 2, 2019, 6:57 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading