CBSE बोर्डाचा मोठा निर्णय; 30 टक्के अभ्यासक्रम करणार कमी

CBSE बोर्डाचा मोठा निर्णय; 30 टक्के अभ्यासक्रम करणार कमी

कोरोनाच्या संकटात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण संस्थांसह सरकारकडून प्रयत्न केले जात आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 7 जुलै : सीबीएसईने 2020-2021 सत्राच्या 9 वी आणि 12 वीच्या अभ्यासक्रमामध्ये जवळपास 30 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

विविध शाळा व्यवस्थापन, पालक, राज्य, शैक्षणिक आणि शिक्षकांच्या सूचनांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. एनसीईआरटी आणि सीबीएसई बोर्डाच्या तज्ज्ञांच्या समितीने हा कोर्स तयार केला आहे. या वेळी पुनरावृत्ती झालेल्या विषयांना आणि इतर अध्यायांत समाविष्ट केलेले विषय दूर ठेवण्याची काळजी समितीने घेतली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे वेळ आणि अभ्यासाचे झालेले नुकसान पाहता मंडळाने हा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या संकटानंतर अभ्यासक्रम कसा असावा याबाबत जनतेला विचारणा करण्यात आली होती. यावेळी एक लाखांहून अधिक जणांनी सूचना दिल्याची माहिती रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली.

Published by: Meenal Gangurde
First published: July 7, 2020, 6:18 PM IST
Tags: CBSE board

ताज्या बातम्या