CBSE Result : स्मृती इराणी आणि केजरीवाल यांच्या घरी निवडणुकीआधीच निकालाचे पेढे

CBSE Result : स्मृती इराणी आणि केजरीवाल यांच्या घरी निवडणुकीआधीच निकालाचे पेढे

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अमेठीमधून लोकसभा निवडणुकीची परीक्षा देत आहेत. अमेठीमध्ये अजून मतदान बाकी आहे आणि निकाल तर थेट 23 मे ला लागणार आहे. पण त्याआधीच लागलेल्या एका निकालामुळे त्या चांगल्याच खूश झाल्या.

  • Share this:

नवी दिल्ली, 3 मे : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अमेठीमधून लोकसभा निवडणुकीची परीक्षा देत आहेत. अमेठीमध्ये अजून मतदान बाकी आहे आणि निकाल तर थेट 23 मे ला लागणार आहे. पण त्याआधीच लागलेल्या एका निकालामुळे त्या चांगल्याच खूश झाल्या.

जोहरला 91 %

स्मृती इराणींचा मुलगा जोहरने सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेत 91 टक्के गुण मिळवत चांगलं यश संपादन केलं आहे. मुलाच्या या यशाबद्दल अर्थातच स्मृती इराणी यांना समाधान आहे.

पुलकितला 96 %

आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचा मुलगा पुलकित केजरीवाल यालाही 96 टक्के गुण मिळाले आहेत. पुलकितने 2017 मध्ये दहावीच्या परीक्षेतही घवघवीत यश मिळवलं होतं. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीलाही या निवडणुकीत किती यश मिळतं हे पाहावं लागेल पण मुलाच्या यशाचा त्यांनाही अभिमान आहे.

स्मृती इराणी यांनी आपल्या मुलाच्या यशाचा आनंद सगळ्यांशी शेअर करत म्हटलं आहे, माझा मुलगा जोहर याचा मला अभिमान आहे. वर्ल्ड केम्पो चॅम्पियनशिपमध्ये त्याला ब्राँझ मेडल तर मिळालंच शिवाय 12 वीच्या परीक्षेतही त्याने कमाल करून दाखवली. खास करून अर्थशास्त्रामध्येही त्याला 94 टक्के गुण मिळवले.

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजेच CBSE ची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 3 एप्रिल या काळात झाली होती. सीबीएसईच्या परीक्षेत यावर्षी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं प्रमाण यावेळी 83.4%. टक्के आहे.

या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. गाझियाबादची हंसिका शुक्ला आणि मुझफ्परनगरची करिश्मा अरोरा यांनी या परीक्षेत चांगलं यश मिळवलं. केरळमधल्या तिरुवनंतपुरममध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे.

==============================================================================================

First published: May 2, 2019, 4:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading