'कोरोना'च्या दहशतीमुळे बोर्डाने 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांबाबत घेतला मोठा निर्णय
'कोरोना'च्या दहशतीमुळे बोर्डाने 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांबाबत घेतला मोठा निर्णय
वेगवेगळ्या परीक्षांचे निकाल हळूहळू येतील. काही यायला लागलेत. अशा वेळी काॅलेज कसं निवडायचं याबद्दल आधीच विचारपूर्वक ठरवायला हवं. या 5 गोष्टींची काळजी घ्यायला हवी.
या व्हायरसमुळे जीवितहानीसोबतच मोठी आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली, 4 मार्च : चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने(Coronavirus) जगभरातील देशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कारण या व्हायरसमुळे जीवितहानीसोबतच मोठी आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. अशातच भारतालाही या व्हायरसची चिंता सतावत आहे. या पार्श्वभूमीवर सीबीएसईने (CBSE) दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा केंद्रांमध्ये फेस मास्क घालण्याची आणि सॅनेटायझर्स नेण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.
चीनमध्ये (China) पसरलेल्या साथीच्या रोगाने संपूर्ण देशामध्ये रौद्र रुप धारण केलं आहे. भारतालाही याचा धोका जाणवत असून सध्या देशात (India) कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या 28 वर गेली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री (Health Minister) डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे.
दिल्लीमधील एका कोरोनाबाधित रुग्णामुळे आग्र्यातील (Agra) 6 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यानंतर जयपूर (Jaipur) येथे पर्यटनासाठी आलेल्या इटालियन (Italian) ग्रुपमधील 16 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यासोबत असलेल्या भारतीय ड्रायव्हरलाही या आजाराची लागण झाली आहे. हैद्राबादमध्ये (Hyderabad) एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या केरळात (Kerala) 3 बाधित रुग्ण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.
हेही वाचा-ट्रिपल सीट आणि हातात सुरा... लुटमारीचा नवा पॅटर्न राबवणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
कोरोनाला रोखण्यासाठी परदेशातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जात असून यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभी करण्यात आली आहे. आज दुपारी तीन वाजता कोरोनासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. कोरोनामुळे घाबरुन जाऊ नका पण खबरदारी घ्या, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे.
Published by:Akshay Shitole
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.