CBSE च्या 10वी आणि 12वीच्या परिक्षांच्या तारखा जाहीर, हे आहे वेळापत्रक!

CBSE च्या 10वी आणि 12वीच्या परिक्षांच्या तारखा जाहीर, हे आहे वेळापत्रक!

cbse.nic.in या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना परिक्षेची सर्व विस्तृत माहिती उपलब्ध आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 डिसेंबर :  केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड म्हणजेच CBSE ने आपल्या 10वी आणि 12वीच्या परिक्षांच्या तारखांची घोषणा केली आहे. CBSE च्या 10वीच्या परिक्षा 21 फेब्रुवारी 2019 ला तर 12वीच्या परिक्षा 15 फेब्रुवारी 2019 ला सुरू होणार आहेत. 15 फेब्रुवारीला सुरू होणाऱ्या या परिक्षा तीन एप्रिलपर्यंत चालणार आहेत.

या परिक्षा सकाळी 10 वाजता सुरू होणार असून दुपारी दीड वाजेपर्यंत चालणार आहेत. 10 वाजता परिक्षा सुरू झाल्यानंतर सुरूवातीला उत्तर पत्रिका देण्यात येईल तर 15 मिनिटांनंतर प्रश्न पत्रिका दिली जाणार आहे. cbse.nic.in या वेबसाईटवर  विद्यार्थ्यांना परिक्षेची सर्व विस्तृत माहिती उपलब्ध आहे.

शालेय अभ्यासक्रम कमी करणार - प्रकाश जावडेकर

'आता टेंशन नको, शाळेचा अभ्यासक्रम 10 टक्क्यांनी कमी  शालेय विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा ताण आणि पाठिवरचं ओझं कमी करण्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलीय. अभ्यासाच्या ओझ्याने मुलं दबून जातात. त्यांना खेळायला मिळत नाही, वाचयला वेळ मिळत नाही त्यामुळं सरकारने हा निर्णय घेतला असल्याची घोषणा जावडेकर यांनी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना केली.

शालेय मुलांना दप्तराचं ओझं होतं. मुलांना अभ्यासाशीवाय दुसरं काहीही करायला वेळ मिळत नाही अशी कायम तक्रार केली जाते. तो धागा पकडून जावडेकर म्हणाले, शिक्षणाचा उद्देश हा उत्तम माणूसं निर्माण करणं हा आहे. केवळ चांगले मार्क्स मिळाले म्हणजे माणूस मोठा होत नाही. सर्वांगिण विकास हा केवळ अभ्यासावर नसतो तर त्याचं वागणं, बोलणं,खेळणं आत्मविश्वास अशा सगळ्या घटकांमुळे मुलांच्या व्यक्तिमत्वाला आकार मिळत असतो.

हल्ली मुलांवर अभ्यासक्रमाचा होणारा भडीमार कमी करण्यासाठी आणि मैदानी खेळात रस वाढवण्यासाठी केंद्रानं हे पाऊल उचललंय. विशेष म्हणजे पहिली, दुसरीचा गृहपाठही रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेत. मुलांनी जास्त खेळावं यासाठी शाळांना खेळाचं सामान खरेदी करायला किमान 5 हजारांची तरतूदही करण्यात आली आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

First published: December 23, 2018, 9:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading