CBSE Board results 2019: दहावी बारावीचा निकाल या दिवशी

CBSE Board results 2019: दहावी बारावीचा निकाल या दिवशी

CBSE बोर्डाचे दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल काही दिवसांत लागू शकतात. बोर्डाच्या अधिकाऱ्याने सांगितल्या या तारखा...

  • Share this:

नवी दिल्ली, 1 मे : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात CBSE बोर्डाचे दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल काही दिवसांत लागू शकतात.

सीबीएसईने निकालांबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी एका वृत्तपत्राला सांगितलं की, मेच्या तिसऱ्या आठवड्यात निकाल घोषित होणार आहेत.

इंडियन एक्स्प्रेसमध्ये आलेल्या वृत्तानुसार, मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात विद्यार्थीजीवनातल्या या महत्त्वपूर्ण परीक्षांचे निकाल लागणार आहेत. सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षांचे पेपर तपासून झाले आहेत आता निकालाचं काम शेवटच्या टप्प्यात आलं आहे. मे च्या पहिल्या आठवड्यात दहावीच्या पेपर तपासणीचं कामही पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. यापूर्वी सीबीएसईच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं होतं की, 12 मे ते 17 मे दरम्यान निकाल जाहीर करण्यात येतील. पण काही कारणानं याला विलंबही होऊ शकतो, अशा अर्थाच्या बातम्याही काही दिवसांपूर्वी आल्या होत्या. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवरून cbseresults.nic.in आणि cbse.nic.in  निकालासंदर्भात सूचना जारी होणार आहे.

First published: May 1, 2019, 10:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading