नवी दिल्ली, 24 जून : सीबीएससी बोर्डाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याबाबद गुरुवारी मोठा निर्णय होणार असल्याची माहिती मिळत आहे. देशातील कोरोना व्हायरसचे वाढते रुग्ण आणि संसर्गाचा धोका लक्षात घेऊन परीक्षांबाबत पुनर्विचार केला जात आहे.
देशात कोरोनाचं थैमान सुरू असल्यानं मार्चपासून सर्व CBSC बोर्डाचे अंतिम वर्षाच्या काही परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. ह्या परीक्षा पुन्हा कधी घ्यायच्या याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. मात्र कोरोनाचा संसर्ग आणि धोका लक्षात घेऊन या परीक्षा रद्द करण्याबाबत उद्या मोठा निर्णय होणार असल्याची माहिती मिळली आहे. तर लॉकडाऊनमुळे सीबीएससीच्या उरलेल्या परीक्षा जुलैमध्ये घेण्यात याव्यात असा निर्णयही घेण्यात आला होता.
CBSC Board Exam 2020 राहिलेल्या विषयांच्या परीक्षा रद्द करण्यात येण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात असलं तरीही अद्याप बोर्डाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.
हे वाचा-
10वी, 12 वीच्या निकाल आणखी लांबणार? 'या' तारखांना लागण्याची शक्यता
अंतिम निर्णय गुरुवारी येणार...
गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला (सीबीएसई) इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रलंबित असलेल्या बोर्ड परीक्षा घ्याव्यात किंवा रद्द कराव्यात याविषयी निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. प्रलंबित परीक्षांबाबतच्या निर्णयावर विचार करण्यासाठी बोर्डाला काही वेळ देण्यात आला होता. CBSC बोर्ड आपला निर्णय गुरुवारी कळवणार असल्याची माहिती मिळत आहे.
संकलन, संपादन- क्रांती कानेटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.