मराठी बातम्या /बातम्या /देश /CBSE BREAKING: मोदींचा मोठा निर्णय; बारावीची परीक्षा रद्द

CBSE BREAKING: मोदींचा मोठा निर्णय; बारावीची परीक्षा रद्द

कोरोना विषाणूच्या (Corona Virus) दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई (CBSE) बोर्डाची 12वीची परीक्षा अखेर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना विषाणूच्या (Corona Virus) दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई (CBSE) बोर्डाची 12वीची परीक्षा अखेर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना विषाणूच्या (Corona Virus) दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई (CBSE) बोर्डाची 12वीची परीक्षा अखेर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवी दिल्ली, 1 जून : कोरोना विषाणूच्या (Corona Virus) दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई (CBSE) बोर्डाची 12वीची परीक्षा अखेर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेली बोर्ड परीक्षांबाबतची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला सीबीएसईचे अध्यक्ष उपस्थित होते. याशिवाय या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकरही सहभागी होते.

देशभरातील कोरोनामुळे झालेली गंभीर परिस्थिती लक्षात घेता परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यावर्षी 12 वीच्या परीक्षा होणार नाहीत, असे सांगण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्विट करून भारत सरकारने बारावीच्या सीबीएसई बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगितले.

परीक्षांविषयी विस्तृत सल्लामसलत केल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षिता आणि त्यांचं  भवितव्य आमच्यासाठी महत्त्वाचं आहे, त्यादृष्टीने आम्ही हा निर्णय घेतल्याचे पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत बारावीच्या परीक्षेसंदर्भात चर्चा करण्यात आली. कोरोना संकटात परीक्षा कशा घेण्यात येतील, परीक्षा घेतली जाईल की नाही, यावर चर्चा करण्यात आली. शिक्षणमंत्री रमेश पोखरीयल आज CBSE बोर्ड परीक्षांबाबत महत्त्वाचा निर्णय घेणार होते, परंतु अचानक प्रकृती बिघडल्यामुळं त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं.

शिक्षण मंत्रालयाला 03 जूनपर्यंत परीक्षांच्या निर्णयाबद्दल सर्वोच्च न्यायालयाला माहिती द्यावी लागणार असल्यानं आजची बैठक अतिशय महत्त्वाची होती. केंद्र सरकारनं काल 31 मे रोजी परीक्षांविषयी निर्णय घेण्यासाठी 2 दिवस अवधी देण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आजही बैठक झाली.

हे वाचा - नागपूर : एक लाखांची खंडणी स्वीकारताना काँग्रेस नेते त्रिशरण सहारे यांना अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

या बैठकीत पंतप्रधानांकडून मंत्री अधिकाऱ्यांसमवेत परीक्षा घेण्याचे पर्याय आणि परीक्षा रद्द करण्याच्या पर्यांयावर चर्चा करण्यात आली. गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत CBSE कडून बोर्डाची परीक्षा घेण्यासाठी दोन पर्याय सुचवले होते. सर्व विषयांची परीक्षा कमी झालेल्या पॅटर्नवर घेण्याचा पहिला पर्याय होता, तर दुसरा पर्याय फक्त महत्त्वाच्या विषयांची परीक्षा घेणे हा होता.

हे वाचा - चिंताजनक! प्रेग्नन्सीत आईने दिला कोरोनाशी लढा; जन्मानंतर अवघ्या काही तासांतच बाळाला MIS-C चा विळखा

काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही काल पंतप्रधान मोदींना पत्र लिहून बोर्ड परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. त्यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं की, विद्यार्थी, पालक आणि शिक्षक सतत परीक्षा रद्द करण्याची मागणी करीत आहेत, त्यामुळे सरकारने त्यांच्या बोलण्याकडंही लक्ष दिलं पाहिजे. या साथीच्या काळात ऑफलाइन परीक्षांच्या माध्यमातून मुलांना संसर्ग होण्याचा धोका आहे.

First published:
top videos

    Tags: Board Exam, CBSE, Narendra modi