सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर, नोएडाची रक्षा गोपाल 99.6 टक्के मार्क मिळवून पहिली

सीबीएसई बोर्डाची नव्या गुणपद्धतीचा वाद दिल्ली हायकोर्टात पोहोचल्यामुळे हा निकाल लांबला होता. मात्र अखेरीस कोर्टानेच बोर्डाला हा निकाल जाहीर करायचे निर्देश दिले.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: May 30, 2017 11:53 AM IST

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर, नोएडाची रक्षा गोपाल 99.6 टक्के मार्क मिळवून पहिली

28 मे : बहुप्रतिक्षित सीबीएसई बारावीचा निकाल आज जाहीर झालाय. आणि नोएडाच्या एमिटी इंटरनॅशनल स्कुलची विद्यार्थिनी रक्षा गोपाल 99.6 टक्के मार्क मिळवून ती पहिली आलीय. रक्षानं इंग्लिश, पाॅलिटिकल सायन्स आणि इकाॅनाॅमिक्समध्ये 100पैकी 100 मार्क मिळवलेत. सायकाॅलाॅजी आणि हिस्ट्रीमध्ये तिला 100पैकी 99 मिळालेत. एकूण 82 टक्के विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झालेत. तिची मार्कलिस्ट वायरल झालीय.

तर दुसऱ्या स्थानावर चंदिगडची भूमी सावंत आलीय. तिला 99.4 टक्के मार्क मिळालेत.

सीबीएसई बोर्डाची नव्या गुणपद्धतीचा वाद दिल्ली हायकोर्टात पोहोचल्यामुळे हा निकाल लांबला होता. मात्र अखेरीस कोर्टानेच बोर्डाला हा निकाल जाहीर करायचे निर्देश दिले. त्यानुसार आज हा निकाल बोर्डाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आलाय.

सीबीएसईचे निकाल आज जाहीर झाल्यानंतर उद्या आयसीएसईचे 10वी आणि 12वीचे निकाल जाहीर होतील. तर राज्य माध्यमिक मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख उद्या जाहीर करण्यात येईल.

Loading...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 28, 2017 02:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...