CBSC Board Results 2020 : 'या' तारखेला येणार दहावी- बरावीचा निकाल

CBSC Board Results 2020 : 'या' तारखेला येणार दहावी- बरावीचा निकाल

निकाल लवकर लागेल अशी विद्यार्थी आणि पालकांना आशा असतानाच आता CBSC बोर्डाकडून निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 जून : कोरोना व्हायरसमुळे CBSC आणि ICSE बोर्डाच्या दहावी-बारावीच्या उर्वरित परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा गुरुवारी करण्यात आली. निकाल लवकर लागेल अशी विद्यार्थी आणि पालकांना आशा असतानाच आता CBSC बोर्डाकडून निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

जुलै महिन्यात दुसऱ्या आठवड्यापर्यंत साधारण 15 जुलैला निकाल जाहीर करण्यात यावा असं सुप्रीम कोर्टाकडून निर्देश देण्यात आले आहेत. दहावी-बारावीचे रद्द करण्यात आलेल्या विषयाच्या पेपरचे मार्क कसे दिले जातील यावर CBSC बोर्ड आपली बाजू कोर्टात मांडत आहे. या प्रकरणाची सध्या कोर्टात सुनावणी सुरू आहे.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना असे मिळणार मार्क

दिलेल्या परीक्षांमधील बेस्ट ऑफ 3 विषयांवरून रद्द झालेल्या विषयांना मार्क दिले जाणार आहे.

ज्यांनी 3 परीक्षा दिल्या आहेत त्यांना 2 परीक्षांमधून बेस्ट ऑफ मार्क दिले जाणार आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी एक किंवा दोनच परीक्षा दिल्या आहेत त्यांना प्रॅक्टिकलच्या बेसवर गुणांकन केलं जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. सीबीएसई आणि आयसीएसई यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, 15 जुलैपर्यंत निकाल जाहीर होईल. सीबीएसई प्रकरणात याचिकाकर्त्याच्या सल्ल्याने असा प्रश्न केला की, बारावीच्या मुलांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी कधी मिळेल, हे देखील स्पष्ट केले जावे. पण या मुद्यावर कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलं नाही.

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 26, 2020, 11:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading