S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • CBIvsCBI : मोदी सरकारला मोठा झटका, सीबीआयचे आलोक वर्मा संचालकपदी कायम
  • CBIvsCBI : मोदी सरकारला मोठा झटका, सीबीआयचे आलोक वर्मा संचालकपदी कायम

    Published On: Jan 8, 2019 11:15 AM IST | Updated On: Jan 8, 2019 11:21 AM IST

    नवी दिल्ली, 8 जानेवारी : सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना सुट्टीवर पाठवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने केंद्र सरकारला चांगलाच धक्का बसला आहे. कारण आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या निर्णयाचं सरकारकडून समर्थन करण्यात आलं होतं. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने सीबीआयचे संचालक आलोक वर्मांना दिलासा मिळाला आहे. अलोक वर्मा आणि सीबीआय डायरेक्टर राकेश अस्थाना यांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत पोलीस स्टेशन गाठलं होतं. त्यामुळं तातडीने करावाई करत केंद्रानं वर्मांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं. सीबीआयमधील या अतर्गत वादामुळे देशभर खळबळ उडाली होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close