ममतांना साथ देणाऱ्या त्या IPS अधिकाऱ्यांवर होणार केंद्राची कारवाई

ममतांना साथ देणाऱ्या त्या IPS अधिकाऱ्यांवर होणार केंद्राची  कारवाई

'या अधिकाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी जी पदकं मिळाली आहेत ती पदकं काढून घेतली जाऊ शकतात.'

  • Share this:

नवी दिल्ली 07 फेब्रुवारी : सीबीआय विरूद्ध ममता बॅनर्जी प्रकरणात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत धरणे आंदोलनात सहभागी होणाऱ्या IPS अधिकाऱ्यांवर केंद्र सरकार कारवाई करण्याची शक्यता आहे. शारदा चीट फंड घोटाळ्यात सीबीआयचं पथक जेव्हा कोलकत्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची चौकशी करण्यासाठी गेले होते त्या वेळी ममता बॅनर्जींनी थेट त्यांच्या निवासस्थानी धाव घेत त्यांचा बचाव केला होता.

केंद्र सरकारच्या या कारवाई विरोधात ममता रात्रीच धरणे आंदोलनावर बसल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यासोबत काही ज्येष्ठ पोलीस अधिकारीही आंदोलनात सहभागी झाले. अधिकाऱ्यांसाठी असलेल्या नियमांनुसार अधिकाऱ्यांना अशा प्रकारे आंदोलनात सहभागी होता येत नाही.

त्यामुळे त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने हालचाली सुरू केल्या आहेत. या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करणारं पत्र केंद्रीय गृहमंत्रालयाने पश्चिम बंगाल सरकारला पाठवलं आहे.

पोलीस महानिरिक्षक विरेंद्र, अतिरिक्त पोलीस महानिरिक्षक विनीत कुमार गोयल, अतिरिक्त पोलीस महानिरिक्षक (कायदा आणि सुव्यवस्था) अंजू शर्मा, ग्यानवंत सिंग, एसीपी सुप्रीमतम सरकार या अधिकाऱ्यांनवर सेवाशर्तींचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

काय कारवाई होऊ शकते?

या अधिकाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी जी पदकं मिळाली आहेत ती पदकं काढून घेतली जाऊ शकतात. या अधिकाऱ्यांच्या पदोन्नती रोखल्या जाऊ शकतात. महत्त्वाच्या नियुक्त्या करताना त्यांना डावललं जाऊ शकतं. किंवा केंद्र सरकार त्यांना प्रतिनियुक्तिवर केंद्रात बोलावू शकते.

मृत्यूचा थरारक CCTV VIDEO, माणसातल्या सैतानाचे भयंकर कृत्य

First published: February 7, 2019, 5:49 PM IST

ताज्या बातम्या