दोन आठवड्यात सीव्हीसीने चौकशी पूर्ण करावी - सर्वोच्च न्यायालय

दोन आठवड्यात सीव्हीसीने चौकशी पूर्ण करावी - सर्वोच्च न्यायालय

10 दिवसात चौकशी पूर्ण करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सीबीआय संचालक आलोक वर्मांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : 10 दिवसात चौकशी पूर्ण करा असे आदेश  सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सीबीआय संचालक आलोक वर्मांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी केली आहे. सक्तीच्या रजेला आव्हान देत सुप्रीम कोर्टानं यामध्ये हस्तक्षेप करावा अशी विनंती त्यांनी केली होती.

केंद्र सरकारनं नियमांचं पालन न करताच आपला पदभार काढून घेतलाय असं आलोक वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयातील आव्हान याचिकेत सांगितलं आहे.  'सीव्हीसी'नं केलेली शिफारस पूर्णत: बेकायदा असल्याचं त्यांनी याचिकेत म्हटलं आहे.

तर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या आदेशावर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी नाराजी व्यक्त केली आहे. चौकशीसाठी आणि तपासणीसाठी 10 दिवसांचा  वेळ पुरेसा नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय?

- दोन आठवड्यात सीव्हीसीने चौकशी पूर्ण करावी

- एनआयए कोर्टातल्या आरोप निश्चिती खटल्याला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा स्पष्ट नकार

- सध्या पुरता नागेश्वर राव सीबीआयचे हंगामी प्रमुख

- निवृत्त न्यायमूर्ती ए.के पटनायक यांच्या देखरेखीखाली ही चौकशी होणार

- सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, सीव्हीसी दोघांनाही नोटीसा बजावल्या

- सीबीआय प्रमुख सध्या कोणतेही घटनात्मक निर्णय घेऊ शकणार नाहीत

- वर्मा विरुद्ध अस्थाना प्रकरणाची सुनावणी न्यायालयाच्या देखरेखीखाली होणार

दरम्यान, विशेष संचालक राकेश अस्थानाही यावेळी सर्वोच्च न्यायालयात उपस्थित होते. राकेश अस्थाना यांनीही सर्वोच्च न्यायालयात अपील केलं आहे. मला लक्ष्य करण्यात येत असल्याचा दावा अस्थाना यांनी केला आहे. सरकारच्या निर्णयाविरोधात आता अस्थानाही सर्वोच्च न्यायालयात उभे ठाकले आहेत.

तर एकीकडे सीबीआय संचालक आलोक वर्मांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याप्रकरणी काँग्रेस आक्रमक झाली आहे. या कारवाईचा निषेध करण्यासाठी आज काँग्रेसकडून देशातील सर्व सीबीआय कार्यालयांवर आंदोलन करण्यात येणार आहे.

राहुल गांधींच्या नेतृत्त्वाखाली दिल्लीतल्या सीबीआय मुख्यालयावर आंदोलन करण्यात येणार आहे. आलोक वर्मांना पुन्हा बोलवावं अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे. तसंच देशातल्या प्रमुख तपास संस्थेच्या प्रतिष्ठेला धक्का लावल्या प्रकरणी मोदींनी माफी मागावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

तर इकडे मुंबईतल्या सीबीआय कार्यालयासमोरही काँग्रेसकडून आंदोलन केलं जाणार आहे. याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सीबीआय कार्यालयाभोवतीची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा सुरक्षेच्या दृष्टीने सीबीआय ऑफिसबाहेर तैनात करण्यात आला आहे.

VIDEO: प्रणिती शिंदेंची जीभ घसरली, भाजप खासदाराला म्हणाल्या बेवडा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 26, 2018 11:52 AM IST

ताज्या बातम्या