मुंबई : आपले पैसे सुरक्षित राहावेत म्हणून आपण बँक किंवा FD मध्ये ते ठेवतो. मात्र आपले पैसे किती सुरक्षित आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण CBI ने GTL आणि काही बँकर्सविरोधात मोठी कारवाई केली आहे.
सीबीआयने जीटीएल लिमिटेड, त्याचे संचालक आणि काही अज्ञात बँकर्सविरोधात 4,760 कोटींच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या लोकांनी कर्जाचे पैसे वळवून बँकांच्या समूहाला ४,७६० कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे.
यामध्ये एकूण 24 बँका असल्याचं समोर आलं आहे. तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, बँक अधिकारी आणि विक्रेत्यांशी संगनमत करून कर्जाची रक्कम हडप केली आहे. 2009 ते 2012 या कालावधीमध्ये हा मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
जीटीएलकडून दरवर्षी काही विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणात आगाऊ रक्कम दिली जात होती, मात्र त्या बदल्यात कोणतीही वस्तू किंवा सेवा दिली जात नव्हती, असं तपासातून समोर आलं आहे. त्यानंतर या अॅडव्हान्ससाठी तरतूद करण्यात आली.
मनी कंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार घोटाळा करण्यासाठी GTL लिमिटेडसोबत आणखी काही वेंडर कंपन्या तयार करण्यात आल्याचं FIR मधून समोर आलं आहे. जीटीएल लिमिटेडचे आयसीआयसीआय बँकेकडे 650 कोटी रुपये, बँक ऑफ इंडियाचे 467 कोटी रुपये आणि कॅनरा बँकेचे412 कोटी रुपये थकवण्यात आले आहेत.
कंपनीने या बँकांकडून काही व्यावसायिक कामांसाठी अल्पमुदतीचे कर्ज दिले होते आणि या निधीचा वापर केवळ नमूद केलेल्या कामांसाठी केला जाईल, असे आश्वासन बँकेला दिले होते. मात्र, कर्जाची रक्कम मिळाल्यानंतर त्यातील बहुतांश रक्कम कंपनीने या कामासाठी वापरली नाही, असे सीबीआयने म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.