काँग्रेसचे संकटमोचक अडचणीत, डीके शिवकुमार यांच्या 15 ठिकाणांवर CBI चे छापे

काँग्रेसचे संकटमोचक अडचणीत, डीके शिवकुमार यांच्या 15 ठिकाणांवर CBI चे छापे

सीबीआयने केलेल्या या कारवाईमुळे कर्नाटकमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सिद्धारमय्या यांनी हे सूडाचे राजकारण असल्याचा आरोप केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली,  05 ऑक्टोबर : काँग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळख असलेले कर्नाटक (Karnataka) चे  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार (DK Shivakumar) सीबीआयच्या रडारवर आले आहे. सीबीआयने शिवकुमार यांच्या 15 ठिकाणावर छापे मारले आहे.

केंद्रीय अन्‍वेषण ब्‍युरो अर्थात सीबीआयच्या टीमने आज सोमवारी सकाळी शिवकुमार यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या ठिकाणांवर छापे मारण्यात आले आहे. सीबीआयने भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात ही कारवाई केली आहे. सीबीआयने  डीके शिवकुमार यांच्या कर्नाटक आणि मुंबईसह अन्न ठिकाणी असलेल्या कार्यालय आणि घरांवर छापे मारले आहे.

सीबीआयच्या टीमने बंगळुरूमधील शिवकुमार आणि त्यांचे भाऊ डीके सुरेश यांच्याशी संबंधीत असलेल्या 15 इमारतींवर सुद्धा छापे मारले आहे. यात डोडालाहल्‍ली, कनकपुरा आणि सदाशिव नगर मधील काही जुन्या घरांचाही यात समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  सक्तवसुली संचालनालय (ED) आणि इन्कम टॅक्स विभागाकडून टॅक्स चोरी आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची चौकशी सुरू होती. याच दरम्यान ईडीच्या हाती काही महत्त्वाची माहिती लागली होती. त्यानंतर ईडीने ही माहिती सीबीआयला दिली. त्यातून सीबीआयने आज सोमवारी छापे मारले.

मिळालेल्या माहितीनुसार,  सीबीआयने डीके शिवकुमार आणि त्यांचे भाऊ डीके सुरेश यांच्या संबंधात आलेल्या इमारतीवर सोमवारी सकाळी 6 वाजता छापा टाकला. या दोघांव्यतिरिक्त शिवकुमार यांचे निकटवर्तीय इकबाल हुसेन यांच्याही ठिकाणांवर सीबीआयने छापा टाकला आहे.

सीबीआयने केलेल्या या कारवाईमुळे कर्नाटकमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सिद्धारमय्या यांनी हे सूडाचे राजकारण असल्याचा आरोप केला आहे. भाजपने सुडाच्या राजकारणातून ही कारवाई केली आहे, असा आरोप सिद्धारमय्या यांनी केला आहे.

'भाजप नेहमी सूडाचे राजकारण करत आली आहे. लोकांचे लक्ष दूर हटवण्यासाठी भाजपने हा प्रयत्न केला आहे. डीके शिवकुमार यांच्या घरावर सीबीआयने छापा मारून आमच्या  पोटनिवडणूक तयारी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला आहे', असं म्हणत सिद्धारामय्यांनी निषेध केला आहे.

Published by: sachin Salve
First published: October 5, 2020, 12:05 PM IST
Tags:

ताज्या बातम्या