बँकांना चुना; CBIची देशातल्या 18 शहरांमध्ये छापेमारी

बँकांना चुना; CBIची देशातल्या 18 शहरांमध्ये छापेमारी

CBIनं देशातील 18 ठिकाणी छापेमारी केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 जुलै : बँकेचे फसवणूक करणारे आता CBIच्या रडारवर आले आहेत. कारण, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयनं देशातील 18 शहरांमध्ये छापेमारी केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सीबीआयनं 18 शहरांमधील 50 ठिकाणी ही छापेमारी केली आहे. यामध्ये कंपन्या, मोठे अधिकारी, बँक अधिकारी यांचा देखील समावेश आहे. सीबीआयनं अधिकाऱ्यांसह 14 जणांविरोधात गुन्हा देखील दाखल केला आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयनं ही कारवाई केली आहे. देशातील 12 राज्यांतील 18 शहरांमध्ये 50 ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. सीबीआयनं दिलेल्या माहितीवरून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयनं आता विशेष अभियान सुरू केलं असून त्यामुळे ही कारवाई केली आहे. या अभियानातंर्गत सध्या देशात ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. सध्या देशात बँकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याविरोधात आता कठोर कारवाई होताना दिसत आहे.

बँकांच्या NPAमध्ये होतेय वाढ

बँकांकडून कर्ज घेऊन अनेक जण सध्या असमर्थता दर्शवत आहेत. शिवाय, बडे उद्योगपती आणि कंपन्यांकडून देखील बँकांचं कर्ज थकवलं जात आहे. त्याचा परिणाम हा बँकांच्या NPAमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आता सीबीआयनं एक विशेष अभियान सुरू केलं असून आर्थिक गैरव्यवहारामध्ये छापेमारी करायला सुरूवात केली आहे.

VIDEO: मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय, बुडता बुडता वाचले 2 बाईकस्वार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 2, 2019 03:04 PM IST

ताज्या बातम्या