मराठी बातम्या /बातम्या /देश /

बिहारमध्ये फ्लोअर टेस्टआधी CBI अ‍ॅक्टिव्ह मोडमध्ये, 24 ठिकाणी छापेमारी; RJD चे चार नेते रडारवर

बिहारमध्ये फ्लोअर टेस्टआधी CBI अ‍ॅक्टिव्ह मोडमध्ये, 24 ठिकाणी छापेमारी; RJD चे चार नेते रडारवर

CBI raid in Bihar:  बिहारमध्ये बुधवारी विधानसभेत फ्लोअर टेस्ट होणार आहे, त्याआधी सीबीआयचे छापे पडले आहेत. अशा परिस्थितीत हे सूडाचे कृत्य असल्याचे म्हणत आरजेडीने केंद्रातील सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Pravin Wakchoure

पाटना, 24 ऑगस्ट : बिहारमध्ये फ्लोअर टेस्ट आधी केंद्रीय तपास यंत्रणा अॅक्टिव्ह झाल्याचं दिसून येत आहे. सीबीआयने बिहारमधील 24 ठिकाणी छापे टाकले आहेत. सीबीआयने भरती घोटाळ्याप्रकरमी ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. सीबीआयने ज्या ठिकाणी छापे टाकले आहेत त्यामध्ये आरजेडी एमएलसी सुनील सिंग, माजी आरजेडी एमएलसी सुबोध रॉय, राज्यसभा खासदार अशफाक करीम आणि फयाज अहमद यांच्या ठिकाणांचा समावेश आहे. बिहारमध्ये बुधवारी विधानसभेत फ्लोअर टेस्ट होणार आहे, त्याआधी सीबीआयचे छापे पडले आहेत. अशा परिस्थितीत हे सूडाचे कृत्य असल्याचे म्हणत आरजेडीने केंद्रातील सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे.

RJD खासदार मनोज झा म्हणाले, आज बिहार विधानसभेत फ्लोअर टेस्ट आहे. त्यामुळे भाजप घाबरवण्यासाठी हा दिवस निवडला आहे, तुम्ही राजकीय लढाई लढू शकत नाही. हे भाजपचे छापे आहेत, याला ईडी, सीबीआय छापे म्हणता येणार नाही. या यंत्रणा भाजपसाठी काम करतात. दिल्लीपासून महाराष्ट्र आणि नंतर बिहारपर्यंत आपल्याकडे एकच स्क्रिप्ट आहे. आम्ही बिहारी टिकाऊ आहोत, विकणार नाही. आम्ही घाबरणार नाही.

Bharat Gogawale : अंगावर आला तर सोडणार नाही, शिंदे गटाचे भरत गोगावलेंचा इशारा

भाजपचं प्रत्युत्तर

दीड वर्षापूर्वी बिस्कॉमनमध्ये कोट्यवधी रुपये पकडले होते तेव्हा खुद्द नितीशकुमार यांनी तक्रार केली होती. त्यानंतर बिहार सरकारने दखल घेतली होती. या सगळ्याचा परिणाम आता दिसू लागला आहे.

झारखंडपासून बिहारपर्यंत ED अॅक्टिव्ह

सीबीआयच्या छाप्यांमध्ये अंमलबजावणी संचालनालय (ईडी) देखील सक्रिय झाली आहे. बेकायदेशीर खाणकामात मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने झारखंड, तामिळनाडू, बिहार आणि दिल्लीतील 17-20 ठिकाणी छापे टाकले आहेत. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पक्षाचे आमदार प्रतिनिधी पंकज मिश्रा आणि बच्चू यादव यांची चौकशी केल्यानंतर ईडीने छापे टाकले. या दोघांना काही काळापूर्वी ईडीने अटक केली होती. ईडीने मार्चमध्ये मिश्रा आणि इतरांविरुद्ध पीएमएलए कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून छापे टाकण्यास सुरुवात केली.

First published:

Tags: Bihar, CBI