चंदा आणि दीपक कोचर यांच्यावर गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली

चंदा आणि दीपक कोचर यांच्यावर गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली

आयसीआयसी बँक आणि व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणी कारवाई करणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 जानेवारी: आयसीआयसी बँक आणि व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणी कारवाई करणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे. या प्रकरणी सीबीआयने 22 जानेवारी रोजी आयसीआयची बँकेच्या माजी प्रमुख चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडीओकॉनचे व्ही.एन.धूत यांच्यासह अन्य लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. ही कारवाई सीबीआयच्या बँकिंग आणि सिक्युरिटीज फ्रॉड सेलचे अधिक्षक सुधांशु धर मिश्रा यांनी केली होती. मिश्रा यांनीच एफआयआरवर स्वाक्षरी करण्यात आली होती. सीबीआयने 24 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील चार ठिकाणी छापे टाकले होते.

या प्रकरणी कारवाई करणाऱ्या मिश्रा यांच्या जागी कोलकाता येथील सीबीआयचे आर्थिक गुन्हे शाखेचे अधिक्षक बिस्वजीत दास यांची दिल्लीत बदली करण्यात आली आहे. कोलकातामध्ये अधिक्षक सुदीप राय यांना दास यांच्या जागी नियुक्त करण्यात आले आहे. तर मिश्रा यांची बदली झारखंडच्या राजधानीत करण्यात आली आहे.

व्हिडीओकॉन कंपनीला कर्ज देताना कोचर यांनी व्यक्तिगत हित बघितले आणि त्याचा फायदा घेतला असा त्यांच्यावर आरोप आहे. कर्ज वाटपात नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपानंतर चंदा कोचर यांना राजीनामा द्यावा लागला होता. बँकेने व्हिडीओकॉनला कर्ज देण्याच्या बदल्यात त्यांनी दीपक कोचर यांना मदत करावी, असा आरोप आहे. कोचर आयसीआयसीच्या प्रमुख असताना व्हिडिओकॉनला 3 हजार 205 कोटीचे कर्ज मंजूर करण्यात आले होते. या प्रकरणी सीबीआयने बुधवारी गुन्हा दाखल केल्यानंतर मुंबई आणि औरंगाबादमध्ये चार ठिकाणी छापे टाकले होते.

Special Report : राज ठाकरेंच्या घरी 'लगीनघाई', अमित-मितालीच्या लग्नाची गोष्ट

First published: January 27, 2019, 2:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading