ममता बॅनर्जी यांच्या विश्वासू अधिकाऱ्याला CBI अटक करण्याची शक्यता

ममता बॅनर्जी यांच्या विश्वासू अधिकाऱ्याला CBI अटक करण्याची शक्यता

ममतांचा हा विश्वासू पोलीस अधिकाऱ्याने चीट फंड घोटाळा प्रकरणी योग्य चौकशी केली नाही असा त्याच्यावर आरोप आहे.

  • Share this:

कोलकाता 26 मे: पश्चिम बंगलामधल्या पराजयानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दुसरा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शारदा चीट फंड प्रकरणी चौकशीसाठी CBI कोलकात्याचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना अटक करण्याची शक्यता आहे. कुमार हे ममतांचे अत्यंत विश्वासू अधिकारी म्हणून ओळखले जातात.

26 मे पर्यंत राजीव कुमार यांना अटक करू नये असं कोर्टाने CBIला बजावलं होतं. आज त्याची मुदत संपल्यानंतर CBIने त्यांच्या कोलकात्यातल्या निवासस्थानी जाऊन त्यांना लुक आऊट नोटीस बजावली. कुमार यांनी कोलकात्यातल्या CBI ऑफिसमध्ये हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.

काही महिन्यांपूर्वी CBIचं पथक जेव्हा त्यांची चौकशी करण्यासाठी त्यांच्या घरी गेलं होतं त्यावेळी कोलकता पोलीस आणि CBIमध्ये वाद झाला होता. कुमार हे पोलीस आयुक्त असल्याने त्यांना अटक कशी काय होऊ शकते असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला होता. हा केंद्राचा डाव आहे असं सांगत त्यांनी धरणही दिलं होतं. त्यावरून वादही झाला होता.

काय झालं होतं फेब्रुवारी महिन्यात

सीबीआय विरूद्ध ममता बॅनर्जी प्रकरणात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत धरणे आंदोलनात सहभागी होणाऱ्या IPS अधिकाऱ्यांवर केंद्र सरकार कारवाई करण्याची शक्यता आहे. शारदा चीट फंड घोटाळ्यात सीबीआयचं पथक जेव्हा कोलकत्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची चौकशी करण्यासाठी गेले होते त्या वेळी ममता बॅनर्जींनी थेट त्यांच्या निवासस्थानी धाव घेत त्यांचा बचाव केला होता.

केंद्र सरकारच्या या कारवाई विरोधात ममता रात्रीच धरणे आंदोलनावर बसल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यासोबत काही ज्येष्ठ पोलीस अधिकारीही आंदोलनात सहभागी झाले. अधिकाऱ्यांसाठी असलेल्या नियमांनुसार अधिकाऱ्यांना अशा प्रकारे आंदोलनात सहभागी होता येत नाही.

त्यामुळे त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने हालचाली सुरू केल्या आहेत. या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करणारं पत्र केंद्रीय गृहमंत्रालयाने पश्चिम बंगाल सरकारला पाठवलं आहे.

पोलीस महानिरिक्षक विरेंद्र, अतिरिक्त पोलीस महानिरिक्षक विनीत कुमार गोयल, अतिरिक्त पोलीस महानिरिक्षक (कायदा आणि सुव्यवस्था) अंजू शर्मा, ग्यानवंत सिंग, एसीपी सुप्रीमतम सरकार या अधिकाऱ्यांनवर सेवाशर्तींचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

First published: May 26, 2019, 9:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading