'या' कायद्यामुळे ममता भारी पडत आहेत मोदींवर

'या' कायद्यामुळे ममता भारी पडत आहेत मोदींवर

देशाच्या इतिहासात सीबीआय आणि एखाद्या राज्याच्या पोलिस दलात प्रथमच अशा प्रकारचा संघर्ष झाला

  • Share this:

नवी दिल्ली, 04 फेब्रुवारी: शारदा चिटफंड घोटाळ्यामुळे केंद्रातील मोदी सरकार आणि पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकार यांच्यात वाद टोकाला पोहोचला आहे. या प्रकरणी कोलकाता पोलिस आयुक्तांची चौकशी करण्यासाठी केलेल्या सीबीआय कोर्टात धाव घ्यावी लागली.

देशाच्या इतिहासात सीबीआय आणि एखाद्या राज्याच्या पोलिस दलात प्रथमच अशा प्रकारचा संघर्ष झाला आहे. या घटनेमुळे असा प्रश्न तयार होतो की, केंद्राने पाठवलेल्या चौकशी पथकाला रोखण्याचा अधिकार खरोखर राज्य सरकारला आहे का?, या प्रश्नाचे उत्तर हो असे येते.

सीबीआयची निर्मिती ही दिल्ली विशेष पोलिस स्थापना अधिनियम-1946 या कायद्यानुसार झाली आहे. या कायद्यातील कलम-5नुसार सीबीआयला देशातील सर्व ठिकाणी चौकशी अथवा तपासणी करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. पण कलम-6 नुसार या चौकशीसाठी राज्य सरकारची परवानगी आवश्यक करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या परवानगी शिवाय सीबीआय राज्यांच्या अधिकार क्षेत्रात प्रवेश करू शकत नाही.

सध्या ममता बॅनर्जी यांनी नेमक्या याच कलमाचा वापर करत मोदी सरकारला वेठीस धरले आहे. केवळ पश्चिम बंगालच नव्हे तर आंध्र प्रदेश आणि छत्तीसगढ या राज्यांनी देखील कलम-6चा वापर करत सीबीआयच्या कारवाईवर बंदी आणली आहे. जोपर्यंत या राज्यांची परवानगी मिळत नाही तोपर्यंत सीबीआय काहीच करू शकत नाही. या कलमामुळे सीबीआय केंद्र सरकारचे अधिकारी, अन्य सरकारी उपक्रमातील अधिकारी इतक नव्हे तर सामान्य व्यक्तींची चौकशी करू शकत नाही. अर्थात यावर सीबीआय कोर्टात याचिका दाखल करून राज्य सरकारचे आदेश रद्द करुन घेवू शकते.

संबंधित बातमी:सीबीआय चौकशी: का घाबरत आहेत ममता बॅनर्जी, जाणून घ्या या प्रकरणाबद्दल A to Z

रविवारी शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणी सीबीआयचे पथक चौकशीसाठी कुमार यांच्या घरी गेले होते. पण येथे सीबीआयच्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी धरणे आंदोलन करत आहेत. दरम्यान, सीबीआयने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर पोलिस आयुक्त कुमार यांच्याविरोधातील सर्व पुरावे 5 फेब्रुवारी रोजी सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

VIDEO : जो आपलं घर सांभाळू शकत नाही, तो देश काय सांभाळणार - गडकरी

First published: February 4, 2019, 4:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading