नवी दिल्ली 16 मे : देशाच्या राजकारणात उलथापालथ घडवून आणणाऱ्या बोफोर्स प्रकरणाची आणखी चौकशी करण्यासंबंधीची याचिका मागे घ्यायची आहे अशी विनंती सीबीआयने दिल्लीतल्या एका न्यायालयात केली आहे. यापुढे चौकशी करावी असं वाटत नाही असं सीबीआयने न्यायालयात म्हटलं आहे. त्यावर निर्णय देत ही याचिका मागे घेण्याची सीबीआयची विनंती न्यायालयाने मान्य केली.
CBI today informed Delhi Court that it wants to withdraw application seeking permission to further probe Bofors case. Private petitioner Ajay Aggarwal also wants to withdraw his plea seeking further probe in Bofors case. pic.twitter.com/d4ZHkJEbRX
— ANI (@ANI) May 16, 2019
तर या संदर्भात एक खासगी याचिका दाखल करण्यात आली होती. ती याचिकाही मागे घेण्याची विनंतीही याचिकाकर्त्यांनी केली आहे. अजय अग्रवाल यांनी ही याचिका दाखल केली होती. कोर्टाने अग्रवाल यांच्या अधिकारांवरच प्रश्न निर्माण केलं. त्यांनी ही याचिका का दाखल केली होती अशी विचारणा न्यायालयाने केली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 6 जुलैला होणार आहे.
Delhi Court allows the CBI to withdraw the application and questions Ajay Aggarwal's locus standi in the matter,next hearing in the case on July 6 https://t.co/5b9xQYeCqp
— ANI (@ANI) May 16, 2019
महानगर दंडाधिकारी नवीन कश्यप यांनी सीबीआयला प्रश्न विचारला होता की चौकशी न करण्यासाठी तुम्हाला न्यायालयाची परवानगी का हवी आहे. कुठल्या कायद्यानुसार तुम्हाला अशा गोष्टींसाठी न्यायालयाच्या परवानगीची आवश्यकता त्या कायद्याची माहिती देण्याचे निर्देशही न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत.
विंग कमांडर अभिनंदनबाबत नवा खुलासा
एअर स्ट्राईकनंतर भारताने पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडलं. त्यानंतर मिग – 21 क्रॅश झालं आणि पाकिस्तानच्या हद्दीत उतरलेल्या विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्ताननं ताब्यात घेतलं. भारत आणि आंतरराष्ट्रीय दबावापुढे झुकत पाकिस्ताननं विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका केली. यावेळी अभिनंदन यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही याचा व्हिडीओ पाकिस्ताननं जारी केला. पण, प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळीच आहे. कारण, विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानची गुप्तचर संस्था असलेल्या ISIनं मारहाण केली होती. शिवाय, मानसिक त्रास देखील दिला होता अशी माहिती समोर येत आहे.